स्टोरीमिरर साहित्य व्यासपीठच्या सोलापूर जिल्हा प्रमुख पदी नूरजहाँ बादशहा शेख यांची निवड

31

✒️अंगद दराडे(विशेष प्रतिनिधी)

सोलापूर(दि.31ऑगस्ट):- स्टोरीमिरर हे देशातील सर्वांत मोठे साहित्य व्यासपीठ म्हणून ओळखल्या जाते. लेखकांनासाठी साहित्य समंधी स्पर्धा उपक्रम घेतांना नेमही ते प्रयत्न शील असतांना दिसते तसेच आता यांची जिल्हा कार्य कारणी घोषित झाली असून सोलापूर जिल्हा प्रमुख पदी सौ. नूरजहाँ बादशहा शेख (कोरबू) अकलूज,तालुका:- माळशिरस, जिल्हा:- सोलापूरयांची निवड करण्यात आली आहे.याबद्दल नूरजहाँ बादशहा शेख मनोगत मध्ये कळवतात प्रथमतः मी स्टोरी मिरर चे प्रमुख रोशन मस्के सर, अंगद दराडे सर यांचे खूप खूप आभार मानते. त्यांच्या सहकार्यामुळेच मी माझ्या विचारांना वाचकांपर्यंत पोहोचवू शकले. धन्यवाद अंगद सर आणि रोशन सर!!

एखादे साहित्य प्रकाशन करताना जेवढा आनंद वाचकांना होतो, त्यापेक्षा जास्त लेखकाला होतो. वाचन केले की लेखन ही सुरू होते. जर लेखन सुरू करायचे असेल किंवा आपल्या भावना, विचार, मत व्यक्त करायचे असेल तर स्टोरी मिरर व्यासपीठ प्रसिद्ध आहे. इथे आपण आपले साहित्य प्रकाशित करू शकतो. रोज कथा कविता प्रकाशित करताना हा आनंद आणि वाचक संख्या पाहून चे समाधान पुढच्या लेखनास प्रोत्साहन देत असते. वेगवेगळ्या भाषांतले कथा-कविता कोट्स यांचे वाचन एकाच ॲप वर एकत्र मिळते.स्टोरी मिरर द्वारे राबवलेल्या स्पर्धा खरेच खूप उल्लेखनीय व अभ्यासू आहेत. यामध्ये स्कूल रायटिंग स्पर्धा ही शिक्षक विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. यामध्ये माझी राजदूत पदी निवड झाल्याने मी स्टोरी मिरर व आयोजकांचे मनापासून आभार मानते. याआदी स्टोरी मिरर तर्फे ऑथर ऑफ द वीक साठी माझी निवड झाली होती.

त्याबद्दल ही मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते. स्टोरी मिरर च्या वतीने माझी सोलापूर जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, त्याबद्दल मी स्टोरीमिरर , मराठी विभाग प्रमुख अंगद सर , रोशन सर यांचेही खूप खूप आभार मानते .शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या कल्पनेला वाव देण्यासाठी स्टोरी मिरच्या (SSWC) स्कूल रायटिंग कॉम्पिटिशन चा सर्वांनी लाभ घ्यावा. यामध्ये आकर्षक बक्षिसांचा भडिमार आहे. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना लिहिण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. त्यांच्या विचारांना एक व्यासपीठ निर्माण करून द्यायला पाहिजे. स्टोरी मिरर हे व्यासपीठ सर्वांसाठी खुले आहे. असे त्यांनी सांगितले आहे.