अतिवृष्टीच्या बेताल पणा मुळे बळीराजाचे आवसान गळाले

27

✒️तलवाडा प्रतिनिधि(शेख आतिख)

तलवाडा(दि.3सप्टेंबर):-अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान गेवराई तालुक्यात झालेले आहे. अनेक ठिकाणी शेती खरडून वाहून गेली, उभ्या पिकांचे नुकसान झाले, घरांची पडझड झाली, राहत्या घरात पाणी गेल्यामुळे संसारोपयोगी साहित्याचे आतोनात नुकसान झाले यांसह रस्ते आणि पुल यांची सुध्दा मोठी हानी झाली. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री.धनंजय मुंडे यांनी आज नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. दौरा सुरु होण्यापूर्वी त्यांनी गेवराईत तहसिलदार, कृषी विभागाचे अधिकारी आणि इतर प्रशासकीय यंत्रणांबरोबर तालुक्यातील नुकसानीचा आढावा घेतला.

तलवाडा महसुल मंडळातील रामनगर, राजुरी मळा यांसह परिसरातील नुकसानग्रस्त शेतीची त्यांनी बांधावर जावून पाहणी केली. चिखलामुळे बैलगाडीतून प्रवास करून प्रत्यक्ष खरडून वाहून गेलेल्या जमीनी पाहिल्या, शेतकऱ्यांचे दुःख समजून घेतले, राजापूर व परिसरामध्ये रस्ते बंद असल्यामुळे प्रत्यक्ष जाता आले नाही तरी तेथील सरपंच व इतरांच्या माध्यमातून नुकसानी बाबत माहिती घेतली. प्रत्यक्ष महिला आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धिर दिला. महाविकास आघाडीचे सरकार नुकसानग्रस्तांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असून खचू नका असेही त्यांनी यावेळी सांगितले.

गोदा परिक्रमेच्या निमित्ताने स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांनी गेवराई तालुक्यातील नुकसानग्रस्तांच्या वेदनांवर घातलेली फुंकर आजच्या धनंजय मुंडे साहेबांच्या दौर्यामुळे नुकसानग्रस्तांना अनुभवयास मिळाल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या. बीड जिल्ह्यातील प्रत्येक नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत मिळवून देणार असल्याचे त्यांनी यानिमित्ताने सांगितले. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी गेवराई विधानसभा मतदार संघात येवून नुकसानग्रस्तांना धिर दिला अतिवृष्टीच्या बेताल पणा मुळे बळीराजाचे आवसान गळाले आसतांना पालकमंत्र्याच्या दौ-याने काही प्रमाणात बळीराजा सह ईतर नुकसान ग्रस्तांना दिलासा मिळाल्याचे हाव भाव आणेकांच्या चेह-यावर या वेळी दिसुन आले.