आदिवासींचा न्याय हक्कासाठी जमातींना स्वराज्य मिळवून देण्यासाठी आदिवासी संशोधन विभाग पुणे कार्यालयावर धडक

27

✒️संजय कोळी(धुळे,जिल्हा प्रतिनिधी)

धुळे(दि.3सप्टेंबर):- आदिन्याय हक्कासाठी जमातींना स्वराज्य मिळवून देण्यासाठी आज रोजी आदिवासी संशोधन विभाग पुणे कार्यालयावर धडक दिलीवासी संशोधन विभाग पुणे येथे सर्व आदिवासी जमातींना स्वराज्य मिळावे या विचारधारेने आयुक्त मा. डॉ. राजेंद्र भारूड यांच्यासोबत महाराष्ट्र राज्यातील 33 आदिवासी जमातींचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते परंतु डॉ. राजेंद्र भारुड यांच्या मनात इतर आदिवासींन विषयी विचार चांगले दिसून आले नाही आणि शासन करेल ते मला मान्य राहील मी तुमच्या समस्या शासनाकडे पाठवेल मग शासनामध्ये आदिवासी विकास मंत्री व अनुसूचित जमातीचे आमदार हे अनेक वर्षांपासून काही आदिवासींना जमातींना शिक्षणापासून नोकऱ्यान पासून योजनांन पासून वंचित ठेवण्याचे काम करत आहे म्हणून ते जात पडताळणी समित्या व आदिवासी संशोधन विभाग पुणे यांच्यात त्यांचे मनमानी करणाऱ्या अधिकारीना बसवतात म्हणून ही काळाची गरज आहे.

सर्व समाज बांधवांना एकत्रित येऊन ही लढाई आपल्या आजादी स्वराज्य मिळवण्यासाठी लढावी लागेल आपण या भारत देशाचे व महाराष्ट्र राज्याचे मूळ आदिवासी कोळी ढोर व टोकरे कोळी महादेव कोळी डोंगर कोळी व मल्हार कोळी या जमातीचे असून आपल्यावर सातत्याने अन्याय करण्यासाठी आदिवासी आमदार व त्यांचे अधिकारी नामसदृष्याचा व बोगस आदिवासी घुसखोर आदिवासी असे शब्द वापरत असतात म्हणून आपल्या न्याय हक्कासाठी आपल्याला सर्वांना एकत्रित येणे गरजेचे आहे आपल्या जाती-जमातींना स्वराज्य मिळवून देणे हे आपलं कर्तव्य आहे म्हणून या अभियानामध्ये माननीय एडवोकेट गणेश साहेब माननीय माजी सैनिक आप्पासाहेब नामदेव येळवे माननीय डी एम कोळी साहेब तसेच महाराष्ट्र राज्यातील आदिवासी कोळी समूहातील गणमान्य व्यक्ती व ठाकूर जमातीतील आणि हलवा हलबी मुन्नारवारलु अश्या अनेक जमातींच्या मान्यवरांनी आम्हाला प्रतिसाथ देऊन आपल्या न्याय हक्कासाठी जमातींना स्वराज्य मिळवून देण्यासाठी आदिवासी संशोधन विभाग पुणे कार्यालयावर धडक दिली.