बिलोली येथील विश्वहिंदू परीषदेच्या कार्यकर्त्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यासाठी तहसिलवर मोर्चा…

27

✒️अशोक हाके(बिलोली,ता.प्र.)मो:-9970631332

बिलोली(दि.10सप्टेंबर):- येथे ऐन बैल पोळ्याच्या सणाच्या दिवशी “गो”गोमातेची हत्या करून मांस विक्री करत असल्याच्या प्रकरणावरून बजरंग दल व मुस्लीम जमातीच्या कुरेशी समाजात हाणामारी झाली.यात दोन्ही गटातील युवक जखमी झाले.यात बजरंग दल व विश्वहिंदू परीषदेच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल प्रकरणी बजरंग दल व विश्वहिॆदू परीषदेच्या वतिने मोर्चा काढण्यात आला.

देशात “गो”हत्या बंद असताना ऐन बैल पोळा सणाच्या दिवशी “गो ” हत्या व मांस विक्री होत असल्याची तक्रार बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलीसांना देऊन स्व:ता पोलीसासोबत गल्लीत जाऊन शहानिशा करण्यासाठी गेले असताना दोन्ही गटाकडून बाचाबाची होऊन हाणामारी झाली.यात काही बजरंग दलचे कार्यकर्ते जखमी झाले.त्यानंतर दोन्ही गटाच्या विरूध्द पोलीसांनी 23 जणाविरूध्द गुन्हा नोंदविला.परंतु बजरंग दलच्या कार्यकर्त्यांची चुक नसताना त्यांच्यावर पोलासांनी गुन्हे दाखल केल्या प्रकरणी दिनांक 9 सप्टेंबर 2021 रोजी बजरंग दल व विश्वहिॆदू परीषदेच्या वतीने बिलोली तहसिलवर मोर्चा काढण्यात आला.

बजरंग दल कार्यकर्त्यावरील गुन्हे मागे घ्यावे अन्यता तीे्व्र आंदोलन करण्यात य़ेईल अशी भुमिका मोर्चेकरांनी घेतली.
या मोर्चेात खासदार प्रताप पाटील चिखलीकर,जि.प.सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड,मुखेड येथील मठस्थाचे विरूपक्षी महाराज,शिवराज पाटील होटाळकर,श्रावण पाटील भिलवंडे,योगेश महाराज बेटमोगरेकर,मारोती वाडेकर,साईनाथ आरगुलवार,शिवाजी कनकंटे,सतिश गौड,गोपी शिंदे,दिलीप उत्तरवार,हेमंत पटाईत विश्वनाथ दाचावार,मुकेश जोशी यांच्यासह जिल्हाभरातुन बजरंग दल,विश्वहिंदू व भाजपचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपसथीत होते.