ग्रामपंचायत अधिनियम कलम ७ अन्वये घेण्यात येणाऱ्या दि.२ ऑक्टोंबर रोजीच्या ग्रामसभेच्या आयोजनाबाबत शासनाची परवानगी

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

मुंबई(दि.23सप्टेंबर):-सार्वजनिक आरोग्य विभाग दि . ११.०८.२०२१ रोजीचे ब्रेक द चेन -सुधारीत मार्गदर्शक सूचना आदेश २ . महोदया / महोदय , दरवर्षी दि . २ ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम , १ ९ ५ ९ च्या कलम ७ अन्वये ग्रामसभा आयोजित केली जाते . तथापि , कोविड -१ ९ आजाराच्या पार्श्वभूमीवर सदर ग्रामसभा आयोजित करावी किंवा कसे याबाबत काही मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद यांनी विचारणा केलेली आहे . या अनुषंगाने नमूद करण्यात येते कि , महाराष्ट्र शासनाच्या संदर्भाधीन आदेशान्वये कोविड प्रदुर्भावास प्रतिबंध करणेच्या अनुषंगाने यापूर्वी घालण्यात आलेले निबंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत .

सदर बाब विचारात घेता , सूचित करण्यात येते की , Social Distancing चे व कोविड -१ ९ च्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीस अधीन राहून दि .२ ऑक्टोंबर रोजी ऑनलाईन / ऑफलाईन ग्रामसभा घेण्यास परवानगी देण्यात येत आहे . सदर परिपञक आ ( सुहास जाधवर ) अवर सचिव , ग्रामविकास महाराष्ट् शासन यांची सही आहे .

महाराष्ट्र, मुंबई, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED