स्टोरीमिरर आयोजित स्त्री शक्ती स्पर्धेत भाग्यश्री बागड या संपूर्ण महाराष्ट्रातुन दुसऱ्या क्रमांने विजेत्या

38

✒️अंगद दराडे(बीड प्रतिनिधी)

बीड(दि.25सप्टेंबर):-स्टोरीमिरर साहित्य व्यासपीठ आयोजित स्त्री शक्ती या स्पर्धेचे प्रत्येक वर्षी आयोजन करण्यात येते, याही वर्षी त्याचे आयोजन करण्यात आले असून त्या स्पर्धेचा निकालl घोषित करण्यात आला आहे, संपूर्ण महाराष्ट्रातुन विविध जिल्यातील साडे चारशे हुन अधीक महिलांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता,नुकताच या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून q राकेश बागड, वलसाड गुजरात यांनी दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे, त्यांचे बक्षीस त्यांना प्राप्त होताच त्यांना अत्यानंद होऊन त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले आहे.

प्रसार माध्यमाशी बोलताना त्या सांगतात की, मी सौ.भाग्यश्री राकेश बागड वलसाड गुजरात. खूप आनंद व्यक्त करावासा वाटत आहे .. मी स्त्री शक्ती सीजन २ या भव्य अशा जगभरातिल मोठ्या स्टोरीमिरर ह्या साहित्य पोर्टल वर घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये मी दुसरी विजेती झाली..खूप खूप आनंद झाला मला.. फेब्रुवारी महिन्यात स्टोरी मिररोर ह्या पोर्टलची निवेदन आले. तेव्हा असं वाटल हे नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी त्या लिंकवर जाऊन ओपन केलं.. पण पुढे मला काही जमत नव्हतं.. स्टोरीमिरर वर कार्यरत असणारे अंगद दराडे दादा यांना फोन करून विचारणा केली़ त्यांनी मला सविस्तर सांगितलं.. कविता चारोळी लेख कसे प्रकाशित करायचे .. ते सर्व मी शिकली आणि स्टोरी मिरर वर रोजच माझं साहित्य टाकत गेली.. आणि माझ्या साहित्याला दर्जेदार लिखाण म्हणून पण संबोधण्यात आलं…तसेच एप्रिल महिन्यात मला सरकार मान्यता प्राप्त ”ऑथर ऑफ विक, म्हणून मला पुरस्कार मिळाला.. नंतर मी जास्तीत जास्त आणि दर्जेदार साहीत्य प्रकाशित केले ..प्रत्येक महिन्याला ह्या पोर्टलवर स्पर्धा चालू असतात आणि मी सातत्याने सहभागी होऊन छान छान सन्मान पत्र घेत असतें…

मार्च महिन्यात झालेल्या स्पर्धेमध्ये “स्त्री शक्ती सीजन २” यात दुसरी विजेती ठरुन.. मला छान अशी सुंदर ट्रोफी माझ्या घरी आली.. तेव्हा माझा आंनद गगनात मावेना.. घरपोच मला बक्षीस मिळालं.. मी साहित्यिकांना इतकच सांगते.. रोज आपण कविता लिहतो आणि मोबाईल लॅपटॉप वर स्टोअर करतो .. कधी तरी कालातंराने मोबाईल लॅपटॉप खराब होते तेव्हा आपल्याला आपलं साहित्य भेटत नाही.. पण ह्या स्टोरी मिररोर वर केव्हाही आणि कधीपण आपलं साहित्य भेटत तिथं ते सुरक्षित असत.. हा माझा अनुभव आहे.. एकच सांगते खूप छान पोर्टल आहे लिहत रहा.. आणि छान छान बक्षीस घेत रहा.. स्टोरीमिरर चे मराठी साहित्य क्षेत्र विभाग प्रमुख रोशन म्हस्के सर यांचे खूप खूप आभार, ते छान मार्गदर्शन करून लिहन्यास प्रेरणा देतात.. तसेच नेहमी साहित्यिक वर्गाच्या सेवेत आणि योग्य मार्गदर्शन करणारे अंगद दराडे दादा यांचे पण खूप खूप आभार..असे सांगून त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत