हिंदू कोड बिल — डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांचा प्रगतीसाठी निर्माण केलेला प्रगतीचा मार्ग….

48

[हिंदू कोड बिल दिन विशेष]

डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचा माध्यमातुन तमाम भारतीयांना ज्या प्रमाणे मुलभुत हक्क व अधिकार मिळुन दिलेत त्याचप्रमाणे हजारो वर्षा पासुन व्यवस्थेमध्ये खितपत पडलेल्या स्त्रियांचा उद्धारासाठी त्यांचे महत्वाचे योगदान आहे. स्त्रियांना सुद्धा पुरुषा प्रमाणे स्वातंत्र्य पुरक , सन्मानाचे जिवन जगता यायला पाहिजे म्हणुन ‘ स्त्रियांसाठी संविधानामध्ये कलम १४ नुसार महिला विषयी लिंगभेदभाव नष्ट करण्याचे प्रायोजन कलम १६ नुसार ‘ स्त्रियांना नौकरी करण्याचे, कलम २१ व २२नुसार, स्त्रियांनी स्वतःचे जीवन स्वइच्छेप्रमाणे जगण्याचे अधिकार, कलम २५ नुसार धार्मिक सामाजिक स्वातंत्र्य , असे बहुमोल अधिकार अर्पण केलेत. परंतु सामाजिक व धार्मिक जिवनात स्त्रियांची अवस्था दयनिय होती. स्त्रियांना स्वतःचे आस्तित्व नव्हते. अनेक अनिष्ठ परंपरांचा माध्यमातुन शोषण करून दुय्यम स्थान दिले जात होते . पुरुषाप्रमाणे त्यांना पण स्वतंत्र जीवन जगता यावे , तसेच समाजामध्ये त्यांना मानसन्मान मिळावा. हजारो वर्षाचा गुलामीचा दास्यातुन मुक्तता व्हावी. त्यांचे जीवनमान बदलावे . म्हणुन डॉ. बाबासाहेबांनी प्रांतिक मंत्रिमंडळा मध्ये कायदेमंत्री बनले तेव्हापासुन त्यांनी स्त्रियांचा प्रश्नाविषयी तत्कालीन प्रातिंक मंत्रिमंडळामध्ये आवाज उठवायला सुरुवात केली.

त्यानंतर त्यांनी हिंदु कोड बिल समिती बनविली . डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे ” देशाची प्रगती ही महिलांचा समाजामधील दर्जा वरून मोजली जाते ” परंतु हिंदू ‘ स्त्रियांची अवस्था भयानक दयानिय होती . म्हणुन त्यांनी हिंदू कोड बिल चा माध्यमातुन स्त्रियां चा उत्थाना साठी धाडसी पाऊल उचलले ते म्हणजे हिंदू कोड बिल.

हिंदू कोड बिल मध्ये ४ महत्वाचे कायदे निर्मिती होती…. १) पितृसत्ताक संपत्ती मध्ये मुलींना समान वाटा. २)वारस निवड – अपत्यहिन स्त्रियांना आपला वारस स्वःता निवड करावी (संपती व पालन पोषण ). ३) घटस्फोट- हिंदू चालीरिती नुसार स्त्रियांना घटस्फोट घेण्याचा अधिकार नव्हता , पुर्नविवाह करण्याचा अधिकार नव्हता. ४)सतिप्रथा विरोध – पुर्वी पतीचे निधन झाले की पत्नीला जीवंतपणी त्याचा सोबत मरण पत्करावे लागे. हे हिंदू कोड बिलाचे महत्वाचे कायद्याचे प्रावधान होते… हिंदू कोड बिलनुसार मुस्लीम धर्मीय सोडुन तमाम हिंदू संस्कृतीशी निगडीत ( बौद्ध, जैन, शीख. लिंगायत. धर्मातंरीत खिश्चन.) स्त्रियांसाठी होता. या बिलाचा कायदयानुसार स्त्रियांचा ” दर्जा ” मध्ये क्रांतिकारक बदल होणार होता. परंतु संसदेमध्ये च संसदेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनीच विरोध केला.. यावरून विरोध किती प्रखर असेल याची जाणीव होते . सनातन्यांनी तर देशभर आक्रव तांडव सुरू केले.

देशभर बिल विरूध्द उग्र आंदोलन करून उच्च वर्गीय माहिलांनीही विरोध केला .पंरतु बाबासाहेब आपल्या क्रांतिकारी निर्णयावर ठाम होते . त्यांनी त्या काळचा नेत्यांना खुप समजावले २६ सप्टेंबर, १९५१ मध्ये संसदेत डॉ.आंबेडकर यांनी बिलाचा समर्थनार्थ ऐतिहासिक भाषण केले , पण त्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरले . शेवटी हे बिल स्थगित ठेवण्यात आले. दुसऱ्याच दिवशी २७ तारखेला ” हिंदू कोड बिल ” साठी त्यांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. पुढे १९५५ – ५६ मध्ये प्रधानमंत्री नेहरू यांचा अध्यक्षतेखाली हे बिल तत्वतः संसदेत मंजुर करण्यात आले . आज स्त्रियांना पुरूषांना बरोबरीचे हक्क व अधिकार प्राप्त झाले आहेत . सर्व क्षेत्रा मध्ये ‘ स्त्रियांनी गगनभरारी घेतली आहे, याचा मागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दिर्घकालीन खुप मोठा संघर्ष आहे.

✒️लेखक:-व्ही.टी.माळी सर [ धरणगांव ]महात्मा फुले हायस्कुल,धरणगांव.मो 8888992668

▪️संकलन- पी.डी. पाटील सर धरणगांव प्रतिनिधी