ओहळात वाहून जाणा-या तरूणाचे वाचवले प्राण….

33

✒️अशोक हाके(बिलोली,ता.प्र.)मो:-9970631332

बिलोली(दि.28सप्टेंबर):- तालुक्यासह कुंडलवाडी शहरात गेल्या दोन दिवसापासुन सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने शहरालगत असलेल्या नांदेड बेस लगत भोर तलाव ओरफ्लोव होऊन वाहात असलेले पाणी शहरालगत दौलापूर रोडवर असलेल्या छोट्या ओहळाला पूर आल्याने दौलापूर येथील देगावे विलास शिवाजी पा. यांची मोटार सायकल क्र.एम.एच २६ एए ५०५२ ही गाडी कुंडलवाडी शहरातील राम राचोटी हे घेऊन येत असताना ओहळाच्या पाण्याच्या प्रवाहासोबत गा़डीसह वाहून गेला. यावेळेस स्थानीक तरूणांनी तात्काळ सर्थकता दाखवत राम राचोटीला पाण्यातुन बाहेर काढुन त्याचे प्राण वाचवले.

हे प्राण वाचवण्याचे सर्थकता साईनाथ निरडी,संदीप बोधनकर,निलेश पाशावार,देवना पाशावार,प्रशांत पांडे सायलू अर्जापूरे,आदीनी दाखवली.गेल्या दोन दिवसापासुन सततच्या मुसळधार पाऊसाने शहर व परीसरातील हातातोंडाशी आलेले सोयाबिन, कापूस,तुर,आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन बळी राजा हवालदिल झाला आहे.तसेच हरनाळी,नागणी,कोटग्याळ,माचनुर,गंजगाव या गावच्या ओहळाला पूर आल्याने कुंडलवाडीचा संपर्क तुटला आहे.त्यामुळे शहर व परीसरातील जनजीवन विस्कळीत झाला आहे.