गंगाबाई तलमले महाविद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

29

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि. 2 ऑक्टोबर):-जगाला शांती व अहिंसेची शिकवण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी व जय जवान जय किसान चा नारा देणारे लाल बहादुर शास्त्री यांची जयंती स्थानिक गंगाबाई तलमले महाविद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाला उद्‌घाटक प्रा. कु. सुप्रीया ढोरे तर अध्यक्षस्थानी प्राचार्य मंगेश देवढगले हे होते. मार्गदर्शन करतांना प्रा. कु. सुप्रिया ढोरे म्हणाल्या की, महात्मा गांधी हे फक्त नाव नसून जीवन जगण्याचा मार्ग आहे. गांधीचे विचार अखिल मानव जातीला तारणारे आहेत.

अध्यक्षीय भाषणात बोलताना प्राचार्य मंगेश देवढगले म्हणाले की, महात्मा गांधीचे विचार हे सर्वव्यापी आहेत. यांनी आपल्याला सत्य, अहिंसा, स्वावलंबन, स्वच्छता, साधेपणा आदी गुण शिकविलेले आहेत.सामाजिक, राजकीय, आर्थीक धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे योगदान अमूल्य आहे. कार्यक्रमाचे संचालन प्रा. संतोष पिलारे व आभार प्रा. गणेश दोनाडकर यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा. श्रीकांत कळस्कर, प्रा. कविता भागडकर, प्रा. पल्लवी धोंगडे, अनिल प्रधान, उमेश राऊत, कुलकिर्ती ठोंबरे तसेच बहुसंख्य विद्यार्थी आभासी पद्धतीने कार्यक्रमात उपस्थित होते.