✒️धरणगाव प्रतिनिधी(पी. डी.पाटील सर)

धरणगांव(दि.5ऑक्टोबर):- महाराष्ट्र म्हटला की त्याला पुरोगामी विचारांची जोड असलेले राज्य अनेक पुरोगामी विचारांवर निष्ठा असलेले लोक महाराष्ट्रात कार्य करीत आहे. अशाच एका अधिकाऱ्याबाबत म्हणता येईल. शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी झटणार्‍या श्री.अशोकजी बिऱ्हाडे यांचे उपक्रमशील प्रयत्नवादी कार्यकुशल गटशिक्षणाधिकारी म्हणून पंचायत राज कमिटीने स्वागत करून अभिनंदनाचा ठराव पास केला.

आपल्या गरीब परिस्थितीची तमा न बाळगता शिक्षण घेऊन प्राथमिक शिक्षकाची नोकरी स्वीकारलेल्या होतकरू गुरुजींचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण पार करून अधिकारी होण्याचे स्वप्न पुरे झाले. विस्तार अधिकारी पासून प्रगत होणारा प्रवास थेट गटशिक्षणाधिकारी पर्यंत पोहोचला. या कालखंडात त्यांनी अनेक शैक्षणिक उपक्रम राबवून कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ख्याती मिळवली. अगदी अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून ते सर्वांना परिचित आहेत. विविध विचारवंतांच्या विचारांवर ते सखोल मार्गदर्शन करून तरुणाईला तेजस्वी दिशा देतात.

सत्यशोधक विचारांवर त्यांनी अनेक भाषणे देऊन राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांची वैचारिक भूमिका असलेले शिक्षक घडविले. पुरोगामी चळवळीत तन-मन-धन अर्पण करून वैचारिक क्रांतीला हातभार लावला. शैक्षणिक कार्यात त्यांनी काटेकोरपणे प्रशासन करून आनंददायी वातावरणाने सर्वांच्या सहकार्याने शैक्षणिक विचार संबंधितांपर्यंत पोहोचविला.

विविध प्रबोधने , लेख यांच्यामार्फत त्यांनी सामाजिक जनजागृतीचे कार्य अविरत चालू ठेवले आहे. अनेक संकटे आलीत परंतु त्यांना लाभलेल्या क्रांतिकारी विचारांचा वारसा त्यामुळे त्यांनी दुःखाला बाजूला सावरून पुन्हा आपल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याला वाहून घेतले. त्यांच्या या प्रेमाने आपुलकीने मानवतेच्या दृष्टिकोनातून केलेल्या कामाचे कौतुक पंचायत राज कमिटीने जाहीर बोलून दाखवले.

त्यांचा हजरजबाबीपणा व कार्यकुशलतेला अखेर न्याय मिळाला. या सऱ्हदय व्यक्तीला अधिकारी, शिक्षक, संस्था चालक, हितचिंतक मित्र परिवाराकडून सर्वत्र कौतुक केले जात आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED