म.गांधी जयंती निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम

30

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.6ऑक्टोबर):-कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गंगाखेड च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दिनांक 2 ऑक्टोबर 2019 या रोजी मौजे हरंगुळ या ठिकाणी उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत सातपुते,सरपंच बिबनसाब पठाण, तसेच ग्रामपंचायत सदस्य, समाजसेविका वनरक्षक गिरी मॅडम, समाजसेविका सौ. ज्ञानेश्वरी लटपटे, विभाग प्रमुख डॉ. प्रकाश सुर्वे व डॉ.सचिन खोकले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

हरंगुळ ते वडगाव स्टेशन रोड हरंगुळ गावातील परिसर या ठिकाणी 101 विविध जातीची झाडे लावण्यात आली. मौजे हरंगुळ हे गाव मागील तीन वर्षांपासून राष्ट्रीय सेवा योजना विभागाने दत्तक घेतलेले आहे.