केंद्र व उत्तर प्रदेश सरकार विरुद्ध आसपा चे शेतकरी सन्मान आंदोलन करणार :सुरेश वाघमारे

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.12ऑक्टोबर):-लखीमपूर येथील शेतकरी व पत्रकार यांच्यावर झालेल्या क्रूर हल्ल्यात शहिदांच्या सन्मार्थ व खाजगी करणाच्या विरुद्ध केंद्र सरकारचा जाहीर धिक्कार निषेध करण्यासाठी” शेतकरी सन्मान आंदोलन ” चे आयोजन केले.

असून उत्तर प्रदेश मधील लखीमपूर खिरी येथील शेतकरी व पत्रकार हल्ल्या विरुद्ध व केंद्र सरकार चे खासगी धोरनआणि उत्तर प्रदेश सरकार च्या गृह राज्य मंत्री मिश्रा च्या मस्तावलेल्या मुलाचा जाहीर धिक्कार व त्याला फाशीची शिक्षा होण्यासाठी जाहीर निषेध करणार असून जनतेच्या मनातील रोष व्यक्त करण्यासाठी “आजाद समाज पार्टी “उत्तर मुंबई जिल्ह्याच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष ऍड भाई चंद्रसेखर आजाद रावण यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात शेतकरी (किसान )सन्मान आंदोलन उत्तर मुंबई जिल्हा आजाद समाज पार्टी च्या माध्यमातून मालवणी गेट नं 1, फायर ब्रिगेड या ठिकाणी संविधानाच्या चौकटीत राहून विधायक मार्गाने जनतेला त्रास होणार नाही.

व कोरोना नियमाचे पालन करण्याची दक्षता घेऊन सदर आंदोलन “आजाद समाज पार्टी” चे मुंबई अध्यक्ष मा. कैलास जी जैस्वार यांच्या मार्गदर्शना खाली. करणार असून केंद्र सरकार व उत्तर प्रदेश सरकार च्या विरुद्ध तीव्र निदर्शने करणार असून सदर आंदोलन स्थळ. फायर ब्रिगेड मालवणी गेट नं.1 मालाड पश्चिम मुंबई येथे कारण्यात येणार आहे वेळ दुपारी ठीक 2 :वाजता दिनांक 17 आक्टोबर 2021रोजी रविवारी उत्तर प्रदेश सरकार च्या हिटलर शाही विरुध्द तीव्र निदर्शने करणार असून या शेतकरी सन्मान आंदोलनात जास्तीत जास्त जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन “आजाद समाज पार्टी “उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष सुरेश वाघमारे यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे केलें आहे

महाराष्ट्र, मुंबई, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED