सागर तायडे यांच्या “क्रांतिकारी विचारांच्या सागर लाटा”चे प्रकाशन पूर्व २५ टक्के सवलत

30

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.15ऑक्टोबर):-तथागत बुद्ध,महात्मा ज्योतिबा फुले,रावबहादूर नारायण मेंघाजी लोखंडे,राजर्षी शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन गेली पंचवीस वर्ष विविध वृत्तपत्रात पत्रकारिता व स्तंभ लेखन करणारे सागर रामभाऊ तायडे यांच्या निवडक लेखाचे दोन पुस्तके…

१) क्रांतिकारी विचारांच्या सागर लाटा,२) आरक्षण लाभार्थींनी शासनकर्ती जमात बनावे, हे दोन पुस्तके सेवानिवृत्ती समारंभात रविवार दिनांक.३१ ऑक्टोबर २०२१ रोजी संध्याकाळी ६-०० वा.सह्याद्री विध्यामंदीर छत्रपती शिवाजी महाराज तलावाच्या बाजूला भांडूप येथे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित होणार आहे.

प्रकाशन पूर्व २५ टक्के विशेष सूट २००-०० रुपये किंमतीचे दोन पुस्तके सवलतीत फक्त १५०-०० रुपयात पोस्टाने किंवा कुरियर ने मिळेल. त्यासाठी आपले संपूर्ण नाव पत्ता मोबाईल नंबर 9833841309 वर नोंद करून गुगल पे करावे असे प्रशांत तायडे यांनी आवाहन केले आहे.