तरुणांनी खचून न जाता व्यवसायाकडे वळावे – देविदास आबा धस

26

🔸डेनिम मेन्स फॅशन कलेक्शनचे आष्टीत उद्घाटन संपन्न

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.22ऑक्टोबर):-तालुक्यातील मांडवा येथील युवा उद्योजक सागर मुटकुळे यांच्या डेनिम मेन्स फॅशन या नुतन दालनाचे उद्घाटन माजी जि.प.सदस्य देविदास आबा धस यांच्या हस्ते गुरूवार दि.२१ आँक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता संपन्न झाले.

यावेळी बोलताना माजी जि.प.सदस्य धस म्हणाले की,सद्य स्थितीत बेरोजगारीचे प्रमाण वाढले असून कोरोना महामारीमध्ये अनेकांच्या हातचे काम गेल्याने उपासमारीची वेळ आली आहे.नौक-या नसल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढले असून तरुणांनी खचून न जाता डेनिम मेन्स फॅशनचे मालक सागर मुटकुळे यांचा आदर्श घेऊन तरुणांनी व्यावसायाकडे वळले पाहिजे.

येणाऱ्या काळात डेनिम मेन्स कलेक्शन नावारुपाला येऊन ग्राहकांना दर्जेदार वस्त्र देऊन आष्टी शहराच्या वैभवात भर पडणार असल्याचे मत यावेळी बोलताना व्यक्त केले.यावेळी राजाबापू शेळके,जगन्नाथ ढोबळे,अँड.राकेश हंबर्डे,अजित डिसले,युवा नेते अमोलराजे तरटे,सुरेश मुटकुळे,सरपंच अशोक मुटकुळे,प्रदिप कर्डिले,रावसाहेब मुटकुळे,अनिल मुटकुळे,सुनिल कर्डिले,किरण नालकोल आदी उपस्थित होते.