महावीतरणाच्या भोंगळ कारभार

28

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी,येवला)मो:-९६०४१६२७४०

🔺महावीतरणाच्या पोलवर काम करणाऱ्या कामगाराचे थोडक्यात बचावले प्राण

येवला(दि.२७ऑक्टोबर):- येवला तालुक्यातील तळवाडे गावातील महावीतरणाच्या कंत्राटी कामगाराचा जीव वाचला आहे परमीट एका लाईनचे आणि काम दुसऱ्या लाईन वर चालू असा महावीतरणाचा भोंगळ कारभार आज उघडकीस आला आहे.तळवाडे येथीला ११ केवी वर काम चालू असताना आचाणक विधुत केंद्रातिल विज नियंत्रित करणारे फ़ीडर आचाणाक बंद पडल्याने विद्युत प्रवाह सुरू झाला.

कर्मचारी अमोल भगवान पाटील हा पोलवर काम करत असताना विधुत प्रवाह आचाणक चालू झाला आणि तो भाजून गंभीर जखमी झाला आहे स्थानिक रहिवासी असलेल्या सुनील आरखड़े व अनिल आरखडे यांनी प्रथमोचरासाठी तातडीने उपजिल्हा रुग्णालय येवला येथे घेऊन गेले असता तो जास्त भाजल्याने त्यास जिल्हा रुग्णालय नाशिक येथे हलवण्यात आले आहे ह्य घटनेची सखोल चौकशी होऊन दोशीवर कठोर कारवाई करण्यात यावि अशी मागणी येवलेकर करत आहे.