जलसंधाणासाठी पारडंगाव वासिय जनतेने बांधला वनराई बंधारा

30

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.30ऑक्टोबर):-आपल्या आदर्श कामासाठी येथील युवकांनी पारडंगाव नेहमीच चर्चेत ठेवलं आहे,आज पुन्हा जलसंधारण बाबद याची प्रचिती आली.

राज्यातील काही भागात मुळातच पाऊस कमी पडतो आणि पडणारा पाऊस थोड्या दिवसात पडून जातो, त्यामुळे जवळ जवळ वर्षभर पाण्यासाठी वणवण फिरण्याची पाळी ग्रामीण भागातील जनतेवर विशेषतः महिलांवर येते. कित्येक वेळा टँकरने पाणी आणून ते गावातल्या विहरीत ओतावे लागते आणि असे ओतलेले पाणी मिळवण्यासाठीही स्त्रियांची तारांबळ होते. पिण्याच्या पाण्याची ही तर्हा तर शेतीची परिस्थिती फारच अवघड आहे.

याचीच जाणीव ठेवून ग्राम पंचायत युवा सरपंच पिंटू पिल्लेवान यांनी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, शिक्षकवृंद तसेच गावातील होतकरू तरुणांची मदत घेऊन “पाणी अडवा पाणी जिरवा व पाणी पातळी वाढवा” हा युक्तिवाद साधून बंधारा बांधला व इतर गावापुढे आदर्श प्रस्थापित केला.शाळेतील विद्यार्थी सर्व शिक्षकवृंद यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्राम विकास अधिकारी पाटील मॅडम यांनी कामाला हातभार लावला,त्याच वेळी गावातील कोतवाल आदित्य तोंडरे,रोजगार सेवक मनीष गिरी,कृषीमित्रं राजू ढोरे,शिपाई सचिन ठेंगरी, मोरूजी दोणाडकर रामचंद्र पारधी,सुधीर ठेंगरी पं.स.ब्रम्हपुरी,कुंदन लांजेवार यांचं सहकार्य लाभलं.