उमेदच्या स्वयंम सहाय्यता समुहांसोबत दिवाळी फराळ, साहित्य प्रदर्शन व विक्री स्टॉलचे थाटात उदघाटन…

29

✒️नितीन पाटील(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.1नोव्हेंबर):- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पं. स. चिमूर अंतर्गत कार्यरत स्वयंसहाय्यता समूहातील होतकरु महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा व स्वयंसहाय्यता समूहांनी दिवाळी सनानिमित्य बनविलेल्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री व्हावी यासाठी पंचायत समिती चिमूर येथे स्टॉल उभारून दिवाळीचे फराळ,साहित्य प्रदर्शन व विक्री स्टॉलचे थाटात उद्घाटन श्री. विलास डांगे माजी जि. प. सदस्य जि. प. चंद्रपूर, यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

या कार्यक्रमाला सन्माननिय श्री. राजेश बरसागडे तालुका अभियान व्यवस्थापक, मा. प्रशांत मडावी तालुका व्यवस्थापक, मा. मेघदीप ब्राह्मणे तालुका व्यवस्थापक, मा. रजनी खोब्रागडे तालुका व्यवस्थापक, मा. सुरेश धारणे लेखा प्रशा. सहा. उपस्थित होते. मा दुर्गा समूह पळसगाव, लावण्या समूह नवतळा, वाल्मिकी समूह वडसी, सुकण्या समूह वाघेडा, वैष्णवीदेवी समूह मुरपार, सोनाली समूह नवतळा येथील अध्यक्ष,सचिव, कोशाध्यक्ष , पदाधिकारी तसेच समूहाच्या महिला उपस्थित होते.

सादर परदर्शनी मध्ये ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेले आकाश दिवे, कागदी पत्रावडी, ऑरगॅनिक राईस, चकल्या, मातीच्या विविध शोभिवंत वस्तू, दिवाळीच्या वस्तू, महिलांकरिता विविध प्रकारच्या साड्या ठेवण्यात आल्या होत्या.

कार्यक्रमाचे यशस्वितेकरिता प्रभाग समन्वयक हेमचंद बोरकर, ईश्वर मेश्राम, स्वप्ना उराडे, सारिका बाहुरे, दीपाली दोडके, अमर कोडपे व उमेद अभियानात कार्यरत सर्व समूह संसाधन व्यक्ती,कृषी सखी यांनी परिश्रम घेतले. दिवाळीचे फराळ,विक्री स्टॉलचे थाटात उद्घाटन झाले.स्टॉल लागताच एकूण 1600रु/-विक्री झाली.मा. विलास डांगे ,माजी जि. प. सदस्य यांनी दिवाळी फराळ वस्तुची खरेदी केली व महिलाचे खूप कौतुक केले. यानिमित्याने जास्तीत जास्त लोकांनी दिवाळीचे फराळ व साहित्य खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले .