लोकनेते दि बा पाटील साहेबांच्या 1984 च्या सिडको विरुद्धच्या लढाईतील शेतकऱ्याने केला आत्महत्येचा प्रयत्न.लोकनेते दि बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण प्रकरणात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याकडे सिडको, महाराष्ट्र शासन आणि सर्वपक्षीय नेतृत्वाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याची सर्वत्र चर्चा होत आहे. “दिव्या खाली अंधार” म्हणजे काय असतो ? हे सर्व राजकीय नेते,आयएएस अधिकारी आणि शेतकरी मच्छिमार नेत्यांच्या बाबतीत प्रत्ययास येत आहे.

1984 च्या सिडको भुसपादनात वसंत दादा पाटील या मराठा मुख्यमंत्र्याने बंदुकीच्या गोळ्या घालून पाच माणसे मारून जबरदस्तीने ज्या आमच्या जमिनी घेतल्या गेल्या.तो प्रकल्पग्रस्तानचा संताप दत्तू ठाकूर वय 78 वर्षे ,धुतुम या शेतकऱ्या मध्ये ठासून भरला आहे.आजच्या दिवसापर्यंत त्याना सिडकोकडून पुनर्वसन न मिळणे हे वॉट्सप फेसबुक वरील माझ्या तरुण सुशिक्षित बंधू भगिनींचे अपयश आहे.नाकर्तेपणा आहे असे मी समजतो.आमच्या जातीचे पातीचे सर्वपक्षीय राजकीय नेते आमच्या गरीब मागास ओबीसी आगरी कोळी सागरपुत्र समाजापासून खूप दूर गेले आहेत.जी अवस्था आज सिडको प्रकपग्रस्त शेतकऱ्यांची आहे.तीच एकही रुपया न मिळालेल्या नवी मुबंई विमांनतळातील आगरी कोळी कराडी मच्छिमार बांधवांची आहे.

आजी माजी आमदार खासदार यांना माती भरावाचे तीन तीन हजार कोटी रुपयांचे ठेके मिळाले की ते आपल्याच गरीब भावंडाना पायाखाली तुडवितात, हा उच्चवर्णीय मराठा ब्राह्मण वैश्य उच्चवर्णीय नेतृत्वाचा शोषनाचा आदर्श घेऊन मनुस्मृतीच्या वाटेने चालतात.शेवटच्या विधवा महिलेला पुनर्वसन मिळवून देण्याचा वसा घेतलेले लोकनेते दि बा पाटील हे डॉ बाबासाहेब आंबेडकर नारायण नागु पाटील यांच्या वैचारिक नेतृत्वाखाली लढणारे नेते होते. मुंबई परिसरातील दोन कोटी ते चार कोटी रुपये गुंठा ,मौल्यवान पिकत्या जमिनी महाराष्ट्रातील सरंजामी ब्राह्मण मराठा नेतृत्वाने विकासाच्या नावे विकून खाल्ल्या.आमची भातशेती बागायती मिठागरे संपविली.

आता त्यांचा डोळा उरल्या सुरल्या कोळीवाडा गावठाणांचा मौल्यवान जमिनीचा तुकडा गिळण्यावर आहे.बिल्डर राजकीय नेत्यांच्या युतीसोबत मुबंई तील उच्चभ्रू स्वयंसेवी संस्था, पर्यावरण वादी यांनी आगरी कोळी भंडारी ईस्ट इंडियन आदिवासी यांना फसविण्याचा विडा उचलला आहे. जुहू मोरा (मांगेला) गावठाण, या कोळीवाड्याचा सीमानकीत नकाशा मिळूनही आम्हाला एस.आर.ए .हवा असे तेथले सुशिक्षित म्हणत असतील तर अशिक्षित मच्छीमाराना जावे कुठे हा गंभीर प्रश्न निर्माण होतोय?. मुबंईतील सर्वच कोस्टल रोड प्रकल्पात 2013 च्या कायद्यांने पुनर्वसनाची मागणी करू नका असे सांगणारे कोळीवाडा गावठाणात असलेले पदवीधर,खणखणीत इंग्रजी बोलणारे आमच्या जातीचे लोक आमच्या गरीब भावंडाना फसवत नाहीत ना?. कोळीवाडा गावठाणाचे प्रस्ताव देत असताना विरोध याच सीआरझेड वादी, पर्यावरणवादी आर्किटेकत वकिलांनी केला होता.ज्यानी कायदा वाचलेला आहे तेच लोकांना सरकारकडे, भीक मागा, याचना करा असे सांगत असतील तर याचा अर्थ काय?.

कोळीवाडा गावठाण यांचे शिमांकन होणे म्हणजे जमीन हक्क मिळविणे होय.वरळी कोळीवाड्याचा शासकीय सातबारा प्रॉपर्टी कार्ड असताना तेथे बिल्डर घुसवून , एसआरए चे समर्थन करणारे सुशिक्षित हे “कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ” ठरत आहेत.2013 च्या कायद्यांने गरीब मच्छिमार खलाशी,मच्छिमार महिला यांना मिळणारी पंधरा पंधरा लाख रुपयांची नुकसान भरपाई मा जिल्हाधिकारी, मत्स्यव्यवसाय आयुक्त, मा उच्च न्यायालयात केवळ मागणी नसल्यामुळे.वाया जात असेल?.तर सरकारचा, ठेकेदारांच्या नफ्याचा विचार करणारे हे बुद्धीवन्त कोळीवाड्याचे “कलम कसाई” आहेत. असे म्हणावे लागेल.
सीआरझेड,पर्यावरणवादी,फसव्या याचिका करून हारणारे वकील,उच्चभ्रू लोक “आम्हीच मच्छीमारांचे नेते आहोत” असे भासवून सरकार,न्यायालये यांची प्रथम दर्शनी दिशाभूल करीत आहेत.2013 च्या मच्छिमार पुनर्वसन कायद्याच्या आधारे, मागणी न करणाऱ्या मच्छिमार संस्था,सोसायट्या डोळे मिटून दूध पित असतील तर?.हे फार काळ चालणार नाही. “मला सुशिक्षत लोकांनी फसविले” अशी व्यथा मांडणारे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जी खंत व्यक्त केली होती.त्याचा प्रत्यय आज ओबीसी मच्छिमार बांधवांना ही येत आहे.

शिवसेना भाजपा हे सीकेपी ब्राह्मण वैश्य हिंदुत्ववादी पक्ष, कॉग्रेस राष्ट्रवादी हे मराठा सरंजामी पक्ष आमचे शत्रूच आहेत.परंतु उच्चशिक्षित ओबीसी एससी एसटी तरुणांनी म्हाताऱ्या आजीला तिचा रोजगार जातोय म्हणून एक अर्ज लिहून द्यावा, ही शेवटची छोटीशी आशा आहे.सिडको पुनर्वसना पासून 1984 ते 2021पर्यंत वंचित उपेक्षित राहिलेल्या दत्तू ठाकूर धुतुम हे वयाची ऐशी गाठलेल्या म्हाताऱ्या सिडको प्रकल्पग्रस्त दि बांच्या आंदोलकाला, सुशिक्षित तरुणाईची लेखणी आधार देत नसेल?. तर त्यांनी करावे काय? मुबंई विद्यापीठ,मुबई आयआयटी,टाटा सामाजिक संस्था शेकडो कॉलेजेस आणि यूपीएससी एमपीएससी,आयपीस डॉ.इंजिनियर प्राध्यापक याचे लक्ष लक्ष “दिवे” मुबंईत असून ही कोळीवाडे गावठाणे येथील प्रकल्पग्रस्त मच्छीमाराना न्याय देऊ शकत नसतील तर ?दिव्या खाली अंधारच ना?. बांधवांनो हा अंधार संपविण्यासाठी स्वतःस तेजोपुंज बनवून समाजाला जागे करणारे बुद्ध ,महावीर, महात्मा जोतिबा सावित्रीमाई डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे दिवे,दीपस्तंभ व्हा. तुमच्या लेखणीचा उपयोग कोळीवाड्यात एसआरए आणि समुद्रात कोस्टल रोडला ना हरकत दाखले देणाऱ्या, “ध” चा” “मा करून मच्छीमारांच्या भावी पिढ्या मारणाऱ्या क्रूर, सत्तापिपासू आनंदीबाई पेशवीन बनू नका. मातृसत्ताक आई एकविरा तुम्हास चांगले काय वाईट काय? हे सांगणारी बुद्धाची “प्रज्ञा” म्हणजे शहाणपण देईल. तुमच्या शिक्षणात प्रामाणिक पणाचे शील नसेल त्या शिक्षणाचा अशिक्षित मच्छीमाराना उपयोग काय?

✒️सुलोचना पुत्र.राजाराम पाटील, उरण(8286031463)

महाराष्ट्र, लेख, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED