आगीत घर जळून खाक कुटुंब उघड्यावर आसापूरातील घटना

28

🔹जीवितहानी नाही : दीड लाखाच्यावर नुकसान

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.3नोव्हेंबर):-पहाडावरील जिवती तालुक्यातील आसापूर येथे चंदू भिमराव कोटनाके यांचे घर सोमवारी मध्यरात्री जळून खाक झाले. यात त्यांच्या घरातील सर्वच जीवनावश्यक वस्तुंचा कोळसा झाला आहे. यावेळी कुटुंबातील व्यक्ती हे शेतात राखण करण्यासाठी गेले असता. घरी फक्त लहान मुलगी होती.घरी कुणीच नसल्याने ती जेवन करून आपल्या नातेवाईकांच्या घरी जोपयला गेली होती. अचानक मध्यरात्री हि घटना घडल्याने सुरूवातीला कुणाला माहिती झाली नाही.शेजारी एक बाई उठल्यावर आगीचे दुवा दिसत असल्याने घराला आग लागली म्हणून आरडाओरडा करत पूर्ण गाव जमा झाल्यावर संपूर्ण गावकऱ्यांनी आग विजवण्यात प्रयत्न केले.

आग खूप वेगाने असल्यामुळे पूर्ण घर जाळून खाक झाले या आगीत कोटनाके यांच्या घरातील सर्वच साहित्याचा कोळसा झाला. यात सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. आगीत घरातील कागदपत्रे, शेतीचे पट्टे, शेती उपयोगी साहित्य, गादी, कपडे, धान्य, स्वयंपाकाचे भांडे यासह कापूस 12 किंटल 8200 च्या भावाने मिळालेले रोख रक्कम व साहित्त्यासह जवळपास दिड लाखाचे नुकसान झाले आहे .आग विझविण्यासाठी घरी पाणी उपलब्ध नसल्यामुळे दिवाळी सण साजरा करण्याकरिता गावात ड्रम मध्ये पाणी भरून असल्यामुळे तेथील पाणी आणून आग विझविण्यात आली. घरात कोणीच हजर नसल्यामुळे जीवितहानी टळली.

आगीत सर्वच भस्मसात झाल्यामुळे अंगावरील कपड्याशिवाय त्यांचे जवळ काहीच शिल्लक राहले नाही. तलाठी गोवर्धन यांनी पंचनामा केला असून तात्काळ मदत मिळावी अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.यावेळी आपत ग्रस्त कुटुंबीयांच्या भेटीसाठी मलकू पाटील कोटनाके, सत्तरशह कोटनाके, सदस्य,दक्षता समिती, कंटू कोटनाके, तालुकाध्यक्ष युवक काँग्रेस जिवती ,सिताराम मडावी महासचिव, जिल्हा युवक काँग्रेस, सलीम शेख, सचिव अल्पसंख्याक काँग्रेस, विकास सोयाम एव्हरेस्ट वीर, दिनेश सोयाम, महादू सोयाम व इतर पदाधिकारी यांनी चंदू कोटनाके कुटूंबियांना भेट देवून सांत्वना केली व एक छोटी आर्थिक मदत दिली.