कष्टकरी शेतकऱ्यांची सेवा हाच आमचा धर्म – रवींद्र चौधरी

29

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)

दोंडाईचा(दि.2नोव्हेंबर):- कष्टकरी शेतमजूर शेतकऱ्यांची सेवा हाच आमचा धर्म असून त्यांच्या समस्या सोडवणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे असे मत *खान्देश तेली समाज मंडळाचे सचिव रविंद्र जयराम चौधरी यांनी व्यक्त केले. ते *जामनेर तालुक्यातील ओझर येथील नुकसानग्रस्त कष्टकरी शेतमजुरांना दिवाळी फराळ वाटपाच्या कार्यक्रमात बोलत होते ओझर या गावात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गोरगरीब शेतमजूर कष्टकरी यांची दिवाळी गोड करण्याचा संकल्प खान्देश तेली समाज मंडळाने केला होता. त्याचाच एक भाग म्हणून आज ओझर येथे फराळ वाटप करण्यात आले.

ते पुढे म्हणाले की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू असून शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन मदत जाहीर केली पण, ती देखील कमी असल्यामुळे वाढवून मिळावी म्हणून मंडळ प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते श्री संताजी महाराज यांचे प्रतिमा पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. ओझर ग्रामस्थांतर्फे सर्व पदाधिकारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर खान्देश तेली समाज मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी,जामनेर पंचायत समितीचे सदस्य रमणदादा चौधरी, कार्याध्यक्ष मनोज मधुकर चौधरी, धुळे तालुका अध्यक्ष भटू पुंडलिक चौधरी, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष सुनील दिलीप चौधरी, महिला आघाडी अध्यक्ष सौ. मालती सुनील चौधरी,सचिव सौ. सविता प्रताप चौधरी, पोलीस पाटील सौ.आनिताताई चौधरी, जामनेर तालुका अध्यक्ष अजय अशोक चौधरी, शेंदुर्णी शहराध्यक्ष सोपान पांडुरंग चौधरी, धुळे तालुका सचिव पंकज संतोष चौधरी, युवक आघाडीचे धुळे जिल्हा सचिव योगेश चौधरी, उपाध्यक्ष नंदू चौधरी, मिलिंद चौधरी आदी उपस्थित होते.

यावेळी चोपडा तालुका अध्यक्ष प्रकाश शंकर चौधरी, धुळे जिल्हा उपाध्यक्ष जयवंत रामदास चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पंचायत समिती सदस्य रमणदादा चौधरी यांनी खान्देश तेली समाज मंडळाने दिलेल्या योगदानाचे व कामगिरीचे कौतुक करून संपुर्ण खान्देशात मंडळाचे काम कौतुकास्पद असल्याचे सांगून,मंडळाने दिलेल्या सहकार्याबद्दल व कष्टकरी,शेतमजूर शेतकऱ्यांविषयी सहानभूती दाखवू धुळे येथे आंदोलन करून मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल त्यांनी मंडळाचे आभार मानले. यावेळी ओझर गावातील अनेक कष्टकरी शेतमजूर बंधू , माता-भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सल्लागार श्री सुनील तात्या सूर्यवंशी (चौधरी) यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका सचिव विलास शालिकराम चौधरी, उपाध्यक्ष विशाल चौधरी, खजिनदार वासुदेव चौधरी, प्रसिद्धीप्रमुख सोपान चौधरी, सारंग चौधरी,ऋषिकेश चौधरी, शुभम चौधरी,अविनाश चौधरी,अरुण चौधरी यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.