गंगाखेड आगारातील एसटी कर्मचाऱ्यांची मुलीची व्यथा

31

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.9नोव्हेंबर):-मी मंजुश्री सुर्यकांत घोणे परभणी विभागातील रा.प.गंगाखेड आगारातील एसटी कर्मचाऱ्यांची मुलगी बोलत आहे.सर्व महाराष्ट्र राज्याचे तारणहार आमच्या सर्वांचे पालक महाराष्ट्र राज्याचे कर्तेकरविते पुरोगामी महाराष्ट्राचे पुरोगामी मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे साहेब.बहुजनहिताय बहुजनसुखाय हे एसटीचे ब्रीद वाक्य आहे त्याच वाक्याप्रमाणे एसटी मधील प्रत्येक कर्मचारी मग ते एसटीतील सफाई कामगार पासून ते अधिकाऱ्यापर्यंत प्रत्येकच व्यक्ती प्रवाशांच्या सेवेसाठी दिवस-रात्र आपली सेवा देत आले आहेत आणि पुढेही देत राहतील. तिच्या कामाच्या तुलनेत त्यांचा मोबदला पाहायला गेलं तर फारच कमी आहे.

वंदनीय बाळासाहेबजी ठाकरे यांचे व्यक्तिमत्व म्हणजे जैसा बोले तैसा चाले आणि तुम्ही वंदनीय बाळासाहेबजी ठाकरे यांचे वंशज आहात आम्ही तुम्हाला त्यांच्याच रुपाने पाहत आहोत. कारण तुमचे जाहीरनामे नसतात तर वचननामे असतात आणि तुम्ही प्रत्येक वेळेस जनतेच्या हाकेला ओ देतात. गेली आठ दिवस झालं जवळपास सव्वा लाख एसटी कर्मचारी तुम्हाला हाक देत आहे तुम्ही आता तरी त्यांच्या हाकेला ओ द्यावी. कारण एसटी कामगार फक्त तुम्हाला त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला मागत आहेत त्याव्यतिरिक्त त्यांना जास्त काहीही नको आहे. आणि इतक्या तुटपुंज्या पगारा मध्ये त्यांचा उदरनिर्वाह झाला असता तर 30 ते 35 दादा, काकांनी आत्महत्या केल्या असत्या का हो साहेब. हा सर्वात मोठा प्रश्न चिन्ह आहे.
तुम्ही आम्हाला मदतीचा हात दाखवला आहे परंतु ती मदत फारचं अल्पशा आहे. आत्ताच्या वाढत्या महागाई मध्ये अल्पशा पगारावर मध्ये उदरनिर्वाह होणे शक्य नाहीये. कारण मुलांचे शिक्षण आहे. बाबा, दादा, काका यांच्या डोक्यावर वाढलेला कर्जाचा डोंगर आहे. आता आम्ही मुलांनी शिक्षण घ्यावे की बाबांच्या डोक्यावर वाढलेल्या कर्जाचा डोंगर निस्तारावा असा प्रश्न आता आम्हा मुलांपुढे सुद्धा येऊन थांबली आहे. आम्ही मुलांनी शिक्षण घ्यावे की आता बेरोजगारी कडे वळावे ?. जे एसटी कर्मचारी प्रवाशांचा प्रवास सुखरूप करतात त्यांनी त्यांच्या आयुष्याचा आणि त्यांच्या कुटुंबाचा प्रवास कसा नीट करावा ? मा. मुख्यमंत्री साहेब.

माझी महाराष्ट्र राज्याच्या कनवाळू मुख्यमंत्र्यांना एवढीच नम्रतेची विनंती आहे की आज जो आत्महत्येचा आकडा ३० ते ३५ आहे तो उद्याला ३५० ते ३५०० घरात जाऊन आमच्या कुटुंबापर्यंत येऊ नये हीच माफक अपेक्षा आहे. एसटी कर्मचारी कुटुंबाचे प्रमुख परिवहन मंत्री मा.अनिल परबजी काका यांनी सर्व एसटी कर्मचारी कुटुंबाच्यावतीने महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना ही वेतन मिळावे ही विनंती तुमच्यापर्यंत पोहोचवावी अशी विनंती मंजुश्री घोणे या मुलींनी केली आहे