आमदार संजय शिरसाट यांच्या निषेधार्थ जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प

26

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.9नोव्हेंबर):- औरंगाबाद येथील आमदार संजय शिरसाट यांनी ग्रामसेवकाबद्दल अपमानास्पद शब्द वापरून आपला अपमान केलेला आहे त्या अपमाना बद्दल ग्रामसेवकामध्ये तसेच संघटनेमध्ये तीव्र नाराजी निर्माण झालेली आहे.आमदार शिरसाट यांनी काल झालेल्या सरपंच परिषदेत ग्रामसेवक संवर्गाबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल या गोष्टीचा निषेध म्हणून राज्यातील 27 हजार 536 ग्रामपंचायतीचे कामकाज ग्रामसेवकानीं बंद ठेवले. आणि काळ्या फिती लावून तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर निषेध लोकशाही मार्गाने नोंदविले.

चंद्रपुर जिल्ह्यातील 850 ग्रामपंचायत चे कामकाज आमदार शिरसाट यांच्या निषेधार्थ ठप्प ठेवण्यात आले.त्यांनी विनाअट माफी मागावी याकरिता राज्यभर आंदोलन छेडले जाणार आहे. तसेच तालुका स्तरावर माननीय तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांना निषेध केल्याचे निवेदन देण्यात आले. तसेच जिल्हा स्तरावर माननीय जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांना निवेदन देऊन निषेध करून गुन्हा नोंद करण्याची मागणी जिल्हा संघटने मार्फत राज्य महिला उपाध्यक्ष *कु. मीनाक्षी बन्सोड*, जिल्ह्याध्यक्ष *प्रकाश खरवडे*, सरचिटणीस *पुंडलिक ठाकरे*, कार्याध्यक्ष *विजय यारेवार*,उपाध्यक्ष *विनोद झिले*, जिल्हा संघटक *किशोर नाईकवर*, सहसचिव *विठ्ठल नखाते*, राज्य समन्वयक *राकेश साव* आणि जिल्हा संघटनेतील पदाधिकारी यांनी केलेली आहे. अशी माहिती जिल्ह्याचे प्रसिद्धी प्रमुख *केशव गजभे* यांनी दिली.