संगीत “माय बाप” या नाटय प्रयोगाचे धनराज मुंगले यांचे हस्ते उद्घाटन

31

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमुर(दि.9नोव्हेंबर):-विधानसभा क्षेत्रातील नागभिड नगरपरिषद अंतर्गत येत असलेल्या मौजा नवखळा येथे सोमवारला यलगार नाटय कला मंडळ नवखळाच्या वतीने खास दिपावली, भाऊबीज व मंडई निमित्य *संगीत मायबाप* या नाटय प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. या नाट्य प्रयोगाचे उद्घाटन चिमूर विधानसभा क्षेत्राचे जेष्ठ काँग्रेस नेते धनराजभाऊ मुंगले यांच्या हस्ते करण्यात आले.

या नाटय प्रयोगाला लाभलेले *सहउद्घाटक गजाननभाऊ पाथोडे (संचालक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक) हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सतीशभाऊ वारजुरकर (सदस्य तथा गटनेता जिल्हा परिषद चंद्रपूर,),प्रमुख पाहुणे म्हणून जयप्रकाश गजपुरे, जयंत पालकर, जहांगीरभाई कुरेशी माजी सरपंच नागभीड, श्रावण नारनवरे, धनराज काटेखाये, समदुर गेडाम, संजय अमृतकर गटनेता नागभीड नगरपरिषद, प्रतीक भसिन, पारसभाऊ नागरे, वैभवीताई खापरे, सोनालीताई दांडेकर नगरसेविका नागभीड, आशाताई गायकवाड नगरसेविका नागभीड, मंगेश नारनवरे, अतुल गडमोडे, शेख सर, श्रावण धारणे, रामू श्रीरामे, अरुण गायकवाड, गेडाम सर, इरफान शेख, पारस वंजारी, शबाना ताई सय्यद तसेच परिसरातील नाट्यरसिक जनता आणि मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.