प्रत्येक गावात येणाऱ्या बालदिनापर्यंत ग्रामबाल संरक्षण समिती स्थापन व्हावी-युवाक्रांती गटाच्या मुलांनी केली तहसिलदार यांच्याकडे मागणी

28

🔸नायब तहसिलदार यांच्या उपस्थितीत केला बालदिन साजरा

✒️नवनाथ पौळ(अंबाजोगाई विभागीय प्रतिनिधी)मो:-8080942185

बीड(दि.15नोव्हेंबर):-जिल्ह्यातील केज तालुका येथे ग्रामीण भागात आज दिनांक 14नोव्हेंबर रोजी केज तहसिलचे नायबतहसीलदार साहेब सचिन देशपांडे सर,पोलीस स्टेशन चे अधिकारी श्री.दादासाहेब सिद्धे सर,शेख सर यांच्या बरोबर कोरो संघटना आणि केज तालुक्यातील युवाक्रांती गटाच्या मुलांनी बालदिन साजरा केला.

यावेळी मुलांनी आपले म्हणणे मांडले की असा बालदिन कोरो मार्फत फक्त 20 गावात चालतो आणि त्यातून मुलांचे अधिकार, सरंक्षण व त्यांचे प्रश्न अशी प्रक्रिया कोरो राबवते तर ही प्रक्रिया आपल्या पूर्ण जिल्ह्यात राबववावी आणि प्रत्येक गावात ग्रामबाल सरंक्षण समिती स्थापन व्हावी म्हणजे सर्व मुलांना संरक्षण मिळेल. तसेच गावात होणारे बालविवाह,अत्याचार ,बालमजुरी आणि ऊसतोड कामगार नोंदणी, आता जो अंबेजोगाई मद्ये बलात्कार झाला त्याबद्दल चर्चा झाली.

त्यावेळी तहसीलदार साहेब आणि शिंदे सर यांनी यास सहमती देऊन आपण यावर बैठक करून नक्की विचार करू असे सांगितले तसेच मुलाच्या काही अडचणी असतील तर कॉल करा,18 वर्षाच्या आत लग्न करू नका असेही मुलांना निक्षून सांगितले.यावेळी कोरो चे कार्यकर्त्या अनिता खंडागळे, रोहिणी ताई खरात,ओमकेश नेहरकर,तसेच पिसेगाव जि.प.शिक्षिका उपस्थित होत्या.