सोंदरी येथे शिवसेना जनसंपर्क कार्यालयात हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची स्मृतीदिन साजरा.

29

🔹हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तळागळापर्यंत पोहचविणार – प्रा.अमृत नखाते

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.17नोव्हेंबर):-हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी अस्मिता टिकविण्यासाठी, आपल्या माणसांना नेहमी जोडण्याचे काम केले. शिवसेना पक्षाची स्थापणा करून हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी खर्‍या अर्थाने मराठी माणूस एकवटण्याचे कार्य महाराष्ट्र राज्यात केले. बाळासाहेबांचे विचार हे प्रेरणादायी असून त्यांचे तेजस्वी विचार तळागळापर्यंत पोहचविणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा. अमृत नखाते चिमूर विधानसभा क्षेत्र चंद्रपूर यांनी सोंदरी येथे केले. ते चिमूर विधानसभा क्षेत्रा अंतर्गत ब्रम्हपुरी तालुक्यातील सोंदरी येथे शिवसेना जनसंपर्क कार्यालयात आयोजित हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृतीदिन कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते._

_कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केवळराम पारधी सरपंच ग्रा.पं.सोंदरी तथा उपतालुका प्रमुख शिवसेना ब्रम्हपुरी हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच हरिराम गडे, उपसरपंच शिल्पा गडे, सुनंदा पारधी, ज्योती ठोंबरे, संगिता देशमुख, सिद्धम मेश्राम ग्रा.पं. सदस्य, तंमुसअ प्रभाकर दोनाडकर, माजी तंमुसअ श्रीराम गडे, संभाजी ढोंगे आदी. मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरूवात हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण व दिपप्रज्ज्वलन करून झाली.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष केवळराम पारधी यांनी शिवसेना कार्यकर्त्यात जर आत्मबल असेल तर जगाच्या पाठीवर शिवसैनिक कुठेही गेला तरी त्याला मरण नाही,त्यामुळे शिवसैनिकांनी एकजुटीने राहण्याचे आवाहन केले. तसेच हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनाकार्यावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे संचालन क्रिष्णा ठाकरे, प्रास्ताविक माजी सरपंच हरिराम गडे तर आभार शिल्पा गडे यांनी मानले. यावेळी कार्यक्रम सफलतार्थ गंगाधर देशमुख, विजय महाजन, केशव देशमुख, प्रकाश देशमुख, गजानन गडे, गजानन भाजीपाले, हिरालाल आंबोने, रमेश ठोंबरे, दिगांबर देशमुख, चक्रधर ठोंबरे, राजू पारधी, मोहन आंबोने, प्रेमदास दानी, वसंता आंबोने, मनोहर पिलारे, अधिकराव पारधी, उद्धवजी पारधी, श्रीधर खोब्रागडे आदींनी अथक परिश्रम घेतले. यावेळी सोंदरी गावातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.