महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद तर्फे गुणवंत शिक्षक गणेशसिंह सूर्यवंशी सर सन्मानित

27

✒️विशेष प्रतिनिधी(पी.डी.पाटील)

धरणगाव(दि.21नोव्हेंबर):-कोविड १९ च्या धर्तीवर कोरोना महामारी च्या कालावधीत शिक्षकांना विविध स्तरांवर कर्तव्ये पार पाडावी लागली. माझे कुटुंब माझी जवाबदारी, सर्वेक्षण, विद्यार्थ्याला पोषण आहार, आरोग्य सेतू, शाळा बंद पण शिक्षण सुरू, झूम मिटींग द्वारे ऑनलाईन शिक्षण, टेली कोल्याबोरेशन इत्यादी. अश्या विविध प्रकारचे कामे पी आर हायस्कूल धरणगाव चे शिक्षक गणेश सूर्यवंशी यांनी कोविड १९ महामारी काळात पार पाडून स्वतःचा व्यावसायिक विकास निरंतर चालू ठेवला. यासर्वाची दखल घेवून सूर्यवंशी सरांना समता शिक्षक परिषदेमार्फत स्मृतिचिन्ह देऊन सरदार वल्लभाई पटेल सभागृह जळगाव येथे जिल्हा मेळाव्यामध्ये सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर समता शिक्षक परिषदेच्या जिल्हा कार्यकारिणीवर सुद्धा त्यांची निवड करण्यात आली.

सदर प्रसंगी माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पनाताई चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, अधिव्याख्याता शैलेश पाटील, जळगावचे माजी महापौर विष्णू भंगाळे, शिक्षण विस्ताराधिकारी खलील शेख, से.नि. गटशिक्षणाधिकारी सुमित्र अहिरे, शिक्षण विस्ताराधिकारी सौ. रागिणी चव्हाण, समता शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाठ, प्रदेश उपाध्यक्ष रावसाहेब जगताप, ज्येष्ठ मार्गदर्शक धनराज मोतीराय, खान्देश विभागीय अध्यक्ष बी एन पाटील, जळगाव जिल्हाध्यक्ष रणजीत सोनवणे, सौ मनीषा देशमुख, मनोज नन्नवरे, सौ छाया सोनवणे/ बैसाणे तसेच जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणावर शिक्षक उपस्थित होते.