रिद्धपुर येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्याहस्ते पशुवैद्यकीय दवाखाण्याचे भूमिपूजन संपन्न !

27

🔹नवीन ईमारत बांधकामासाठी 60 लक्ष 40 हजार रुपयांच्या निधीची तरतूद !

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.21नोव्हेंबर):-रिद्धपुर परिसरामध्ये पशुधन मोठ्या प्रमाणात असून शेती पाठोपाठ दुग्ध व्यवसाय हा जोड धंदा असल्यामुळे आमदार देवेंद्र भुयार यांनी पशुपालकांना पशुधनासाठी आरोग्याच्या सोई सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रिद्धपुर येथे पशुवैद्यकीय दवाखाण्याच्या नवीन ईमारत बांधकामासाठी जिल्हा वार्षिक नियोजने अंतर्गत 60 लक्ष 40 हजार रुपये निधीची तरतुद करुन दिल्याने सदर कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार देवेंद्र भुयार यांच्याहस्ते रिद्धपुर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

पशुधनाच्या तुलनेत मोर्शी तालुक्यात जनावरांचे दवाखाने कमी प्रमाणात आहेत आणि शेतीला जोडधंदा म्हणून पशु पालन आणि दुग्ध व्यवसाय याकडे पाहिले जाते, पशुपालकांना पशुधनास औषध उपचार, लसीकरण, शस्त्रक्रिया इत्यादी बाबी पशुसंवर्धन विभागामार्फत वरील आरोग्य सेवा नियमित पुरवल्या जातात, परंतु पशुधन आजारी पडल्यास पशुधनास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन जावे लागते त्यासाठी पशुपालकांना वाहनाची सोय स्वखर्चाने करावी लागते बहुतांशी शेतकऱ्यांना आर्थिक भार परवडणारा नसतो त्यामुळे अनेकदा पशुवैद्यकीय सेवेअभावी पशु धनाचा मृत्यू होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी रिद्धपुर येथे पशु वैद्यकीय दवाखान्याची मागणी रेटून धरली आणि रिद्धपुर येथे पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नवीन ईमारत बांधकामासाठी 60 लक्ष 40 हजार रुपयांच्या निधीची तरतूद करून दिल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी सांगितले.

रिद्धपुर येथे पशुवैद्यकीय दवाखाण्याच्या ईमारती” साठी जिल्हा वार्षिक नियोजन निधि अंतर्गत 60 लक्ष 40 हजार रुपये निधीची तरतुद करुन दिल्याने सदर कामाचा भूमिपूजन सोहळा रिद्धपुर येथे संपन्न झाला. तसेच रिद्धपुर येथील सहयोग प्रभोधन मंडळ, रिद्धपुर द्वारा संचालित ” अल अजिज हेल्थ सेंटर ” येथे क्रीडा विभाग अंतर्गत 7 लक्ष रुपये निधीची तरतुद व्यायामशाळा साहित्य करिता देण्यात आले. या दोन्ही कामाकरिता निधि उपलब्ध करुन दिल्याने रिद्धपुर, ब्राम्हणवाडा, दाभेरी, बऱ्हाणपूर, इस्माईलपूर, वीष्णोरा, तळेगाव, धामणगाव, पोरगव्हान, कोळवीहिर, आष्टोली, तरोडा येथील पशुपालकांना दिलासा मिळाला.

यावेळी भूमिपूजन समारंभाला आमदार देवेंद्र भुयार, सरपंच गोपालभाऊ जामठे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार, युवक शहर अध्यक्ष अंकुश घारड, माजी जी प सभापती तात्यासाहेब मेश्राम, उपसरपंच अब्दुल साबीर अब्दुल अजिज, माजी उपसरपंच कबीर भाऊ, अमोल कडु, विपुल हिवसे, शेर खान, मंगेश इंगोले, प्रफुल चिखले, मनिष कडु, पंकज हरणे, अज्जू सौदागर, मोहनभाऊ राजस, मो.साबीर नायक, गजानन ढोमणे, सुभाष वानखडे, बंडु पाटणकर, प्रकाश बिडकर, युसूफ खान, मोहम्मद साबीर, मोसीफ खान, शंकर गवंडे, अनिल जामठे, सलमान कुरेशी, शारुख कुरेशी यांच्यासह रिद्धपुर येथील नागरिक उपस्थित होते .