कोरेगाव येथील आंबेडकर नगर व उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

26

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.26नोव्हेंबर):-डॉ.आंबेडकरनगर कोरेगाव,(जि. सातारा) येथे भारतीय संविधान दिवस उत्साहात साजरा करणेत आला. सुरवातीला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संविधानाचे पुजन प्रसिद्ध विधीज्ञ व विचारवंत अॅड.अमोल भुतकर,व युवा नेते अमोल भोसले यांच्या हस्ते झाले नंतर संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन सुरेश येवले यांनी केले या वेळी अॅड.अमोल भुतकर यांनी संविधाना विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमास आंबेडकर नगरातील सर्व नागरिक कोरेगाव शहर व पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन युवा नेते अजय येवले व सहकारी यांनी केले.उमेश सरगडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

त्याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कोरेगाव कार्यालयात संविधान दिवस उत्साहात साजरा झाला.प्रारंभी उपविभागीय अधिकारी मा.ज्योती पाटील व समाजभूषण सुरेश येवले यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व भारतीय संविधानाचे पुजन झाले नंतर मा.जोती पाटील यांनी संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन केले यावेळी सुरेश येवले यांनी संविधान विषयी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास भोसे,कुमठे,सिद्धार्थनगर व कोरेगाव शहरातील विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते कार्यालयातील नायब तहसीलदार मा काळे साहेब यांनी उपस्थितांचे आभार मानले.