‘ब्रम्हपुरी ब्लास्ट’ साप्ताहिक च्या दिवा‌‌ळी अंकाचे प्रकाशन.

🔹पालकमंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांचे हस्ते ‘ब्रम्हपुरी ब्लास्ट’ च्या दिवा‌‌ळी अंकाचे प्रकाशन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.27 नोव्हेंबर):-गेल्या तीस वर्षापासून चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी या तालुक्याच्या ठिकाणाहून प्रकाशित होणारे साप्ताहिक ‘ब्रम्हपुरी ब्लास्ट’ च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपुर जिल्ह्याचे पालक मंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते दिनांक 26/11/ 2021 रोजी ब्रम्हपुरी तालुक्यातील गांगलवाडी येथील एका कार्यक्रमात करण्यात आले.

यावेळी ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तथा बाजार समितीचे ‌‌ मुख्य प्रशासक प्रभाकर सेलोकर, जिल्हा परिषद सदस्य प्रा. डॉ. राजेश कांबळे, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमूरकर, पंचायत समिति सदस्य थानेश्वर कायरकर, ब्रम्हपुरी तालुका अनुसूचित जाति सेलचे अध्यक्ष प्रमोद मोटघरे, प्रा. राम राऊत चिमूर, साप्ताहिक ‘ब्रम्हपुरी ब्लास्ट’ चे संपादक नेताजी मेश्राम इत्यादी उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED