सातपुर सह परीसरात प्रबुद्ध नगरात वंचित तर्फे संविधान दिन उत्साहात साजरा

    44

    ✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

    नाशिक(दि.28नोव्हेंबर):- शहरातील विविध ठिकाणा सह सातपुर येथील प्रबुद्ध नगर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संविधान गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
    यावेळी संविधान गौरव दिनानिमित्त सुरुवातीला २६/११ हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्याचबरोबर संविधान निर्माते विश्वभुषण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

    यावेळी वंचित बहुजन आघाडी च्या सामाजिक कार्यकर्त्या सौ मनिषाताई राहुलजी पटेकर सामाजिक कार्यकर्ते सुरेश भाऊ साळवे, मनोज कांबळे साहेब ,खरात साहेब, अमोल भाऊ जेटीथोर, विकास भाऊ वाकळे, सुरेश भाऊ सुरवाडे, अमोल भाऊ गवळी, रवी भाऊ मोरे यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी संविधान दिनाचा विजय असो बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो वंचित बहुजन आघाडी चा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या व तसेच भारतीय संविधानामुळे आपण आहोत संविधानाने प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आहे सविधाना पुर्वी राणीच्या पोटामध्ये राजा जन्माला येत होता परंतु संविधानामुळे प्रत्येक माणसाच्या बोटामध्ये राजा निर्माण करण्याची ताकद संविधानाने दिली आहे असे वंचित बहुजन आघाडीचे राहुलजी पटेकर यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले