श्रीहरी सातपुते यांची माहिती अधिकार व पत्रकार स्वरक्षण समितीच्या जिल्ह्या उपाध्यक्षपदी नियुक्ति

    62

    ✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

    चिमूर(दि.30नोव्हेंबर):-माहिती अधिकार व पत्रकार स्वरक्षण आणि पोलिस मित्र फाउंडेशन अंतर्गत माहिती अधिकार व पत्रकार स्वरक्षण समितिच्या जिल्ह्या उपाध्यक्षपदी चिमूर येथील ctv न्यूज़ प्रतिनिधि श्रीहरी सातपुते यांची निवड करण्यात आली.

    माहिती अधिकार व पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असताना येणाऱ्या अड़ीअडचणी सोडवत माहिती अधिकार आणि पत्रकारितेची चळवळ सक्षम आणि सशक्त करण्याच्या हेतुने महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेश सारनिकर यांचे मार्गदर्शनात आणि महाराष्ट्र राज्य मुख्य सचिव इद्रीस सिद्दीकी यांचे समतीने चंद्रपुर जिल्ह्या अध्यक्ष गौतम कांबले यांचे शिफारसीनुसार राष्ट्राची लोकशाही विचारधारा यशश्वी करण्यासाठी माहिती अधिकार व पत्रकार स्वरक्षण समितिची ध्येय धोरने लोकशाही भारताच्या शास्वत विकासासाठी राबविन्याची जबाबदारी श्रीहरी सातपुते यांचेवर सोपविन्यात आली,त्यांच्या नियुक्ति बद्दल पत्रकारिता, राजकीय, सामाजिक, क्षेत्रातील नागरिकांडूंन अभिनंदन करण्यात येत आहे,