*भारत प्रभात पार्टी महिला आघाडी जालना जिल्हाध्यक्षा पदी सौ.रेखा सुरेश सारडा यांची निवड*

15

जालना (पुरोगामी संदेश न्यूज नेटवर्क)

भारत प्रभात पार्टी महिला आघाडीच्या जालना जिल्हा अध्यक्ष पदावर रेखा सुरेश सारडा यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

भारत प्रभात पार्टी हा राजकीय पक्ष अर्चना सिंह बहनजी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यात माधव मेकेवाड यांची संपूर्ण टीम कार्य उत्कृष्ट करत आहे त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास करून सौ.रेखा सूरेश सारडा यांनी भारत प्रभात पार्टी मध्ये आपला प्रवेश केला आहे .पक्ष कमिटीने सुद्धा त्यांना महिला आघाडी जिल्हा कमिटीच्या जालना जिल्हाध्यक्षा पदी नियुक्ती देऊन महत्वाची जबाबदारी दिली आहे . सौ.रेखा सारडा यांचं वास्तव्य जालना मध्ये मुख्य शहरात आहे ते जालना शहरात चांगल्या नामांकित नावाजलेल्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. संपूर्ण जालन्यात त्यांचे सामाजिक कार्य अगदी जोमाने सुरू आहे . सामाजिक संघटना मध्ये मुख्य पदाची धुरा पूर्वी सांभाळल्या मुळे त्यांचा निश्चित भारत प्रभात पार्टीला फायदा होणार असल्याचे पक्ष कमिटीच्या पदाधिकारी यांनी कळविले आहे.डॉ.नितीन पवार(राज्य महासचिव) ,बी जी पडवळ(राज्य महासचिव),आरती भोयर(राज्य महासचिव)हेमंत खरात मुंबई(राज्य उपाध्यक्ष),दिलीप शिवाजी पाटील(राज्य सचिव),संभाजी नरवाडे(राज्य सचिव),दिपा आवळे(महिला आघाडी,प्रदेश अध्यक्ष),वत्सला गीते(राज्य महासचिव),सुमनताई पोलशेटवार(राज्य सचिव,महिला आघाडी), कु.जोत्सना राऊत, वैष्णवी दुडगू,साईनाथ शिनगारे (प्रदेश प्रभारी,सोशल मीडिया), आस्मा मुल्ला महिला कार्यकर्त्या , युवक आघाडीचे योगेश साबळे (जालना जिल्हा अध्यक्ष), सौ.ज्योती सारडा,शोभा भुतडा, मोहन जोशी आदींनी त्यांच्या निवडी बद्दल शुभेच्छा दिल्या आहे.त्यांच्या मित्र मैत्रिणी व कौटुंबिक लोक व अनेक मान्यवर देखील शुभेच्छाचा वर्षाव सोशल मीडिया च्या माध्यमातून दिला असल्याचे दिसत आहे.
जालना जिल्ह्यात काँग्रेसमय, भाजपमय वातावरण असलं तरी ते नष्ट करून भारत प्रभात पार्टीचे बीज रोवणार असल्याचे त्यांच्या कडून सांगण्यात आले आता भारत प्रभात पार्टीचे गाव तिथे वार्ड तिथे शाखा करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
जालना शहरात व जिल्ह्यात काँग्रेस,भाजपा, शिवसेना,राष्ट्रवादी ह्या प्रमुख राजकीय पार्टी महत्वाच्या आहेत परंतु जालन्यातील जनता काँग्रेस,भाजपाला वैतागली आहे त्यात पुढील महत्वाच्या निवडणुकीत केवळ भारत प्रभात पार्टी जनतेच्या मनात असणार असल्याचा विश्वास सौ.रेखा सुरेश सारडा यांनी दिला आहे . महिला ह्या राजकारणात उतरल्या पाहिजे देशाचा कणा त्या एक घटक आहेत म्हणून देश पातळीवर राजकीय कार्य करून महिलांना न्याय देणारी पार्टी केवळ हीच आहे म्हणून मी सुद्धा जिल्हाभरात ओळख निर्माण करेन ,आगामी येणाऱ्या सर्व निवडणुका जालना शहर व जिल्हासह इतर सर्व ठिकाणी भारत प्रभात पार्टी लढवणार आहे म्हणून मी ह्या राजकीय पक्षात प्रवेश केला असल्याचे त्यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.