पूर्णा तालुक्यात शिवसेनेच्या उ.बा. गटाला तर पालम तालुक्यात घनदाट, मुरकुटे आणि राष्ट्रवादी गटाला मोठी खिंडार आ. गुट्टे यांच्या फार्महाऊस वर रंगला पक्ष प्रवेश सोहळा.

85

 

 

अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515

गंगाखेड प्रतिनिधी: लोकसभा निवडणूक २०२४ तोंडावर आल्याने निवडणूक आयोग निवडणूक कार्यक्रम कधीही जाहीर करू शकतो. त्यामुळे मार्च महिन्यात आदर्श आचार संहिता लागू शकते. यामुळे राज्यासह देशातील विविध राजकीय पक्ष आपले संघटन अधिक मजबूत कसे करता येईल याकडे विशेष लक्ष देत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीस काही महिन्यातच आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे आपण सदैव तत्पर असणे गरजेचे आहे. कोणताही नेता हा आपल्या कार्यकर्त्यांमुळे मोठा होत असतो. माझ्या संकट काळात माझे कार्यकर्ते व माझे माय बाप मतदार माझ्या आयुष्यात एखाद्या देवदुतासारखे माझ्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे राहिल्याने मी आज आपल्यासमोर उभा आहे. यामुळेच माझ्या मतदारसंघातील माझी जनता व माझे कार्यकर्ते म्हणजे माझा श्वास असून यांच्यामुळेच माझा पुनर्जन्म झाला असल्याचे मत आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केले. तालुक्यातील फार्महाऊस बनपिंपळा येथे पालम व पूर्णा तालुक्यातील हजारो नागरिकांनी आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या कार्यावर व नेतृत्वावर विश्वास ठेवत गुट्टे काका मित्र मंडळात प्रवेश केला या प्रसंगी ते बोलत होते.

पूर्णा तालुक्यातील शिवसेनेच्या उ.बा. गटाचे अत्यंत जुने आणि ज्येष्ठ नेते, पंचायत समिती सदस्य तथा शिवसेनेचे माजी तालुका अध्यक्ष छगनराव मोरे आणि माखणी गावचे सरपंच तथा माजी पंचायत समिती सदस्य नानासाहेब आवरगंड यांनी उ.बा. गटाला सोडचिट्टी घेऊन आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह गुट्टे काका मित्रमंडळात आज प्रवेश केला. तर पालम तालुक्यातील घनदाट मामा मित्रमंडळ, संतोष भाऊ मुरकुटे मित्रमंडळ आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्या विविध पदाधिकाऱ्यांसह सरपंच, उपसरपंच आणि कार्यकर्त्यांनी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गुट्टे काका मित्रमंडळ मध्ये प्रवेश केला आहे. यावरून पूर्णा तालुक्यातील उ.बा. गटाला व पालम तालुक्यातील घनदाट,मुरकुटे व राष्ट्रवादी गटाला मोठी खिंडार पडली असल्याचे बोलले जात आहे.

याप्रसंगी गंगाखेड मतदारसंघातील खांबेगाव, माटेगाव, आहेरवाडी, लोन खुर्द, पांगरा, डिग्रस, माखणी, चुडावा, पालम, अंजनवाडी, पेठपिंपळगाव, रोकडेवाडी, महादेववाडी, सातेगाव, खरबडा, कळगाव श्रीनगर, खुजडा, हटकरवाडी, पूर्णा, ताडकळस, दस्तापुर, सातेफळ, धानोरा, सोन्ना, ममदापूर, गोविंदपूर, चांगेफळ, पांगरा ढोणे, पिंपळगाव लोखंडे, वाई, रेगाव, फुलकळस, दगडवाडी, बंदरवाडी सांगवी तेलजापूर सिरपूर, डोंगरगाव, महादेववाडी, बरबडी, बनवस, भालकुडकी, पेंडू, कोळवाडी, सादलापुर, मानगिरवाडी, गणेशवाडी यांच्यासह आदी गावातील सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन, तंटामुक्तीचे अध्यक्ष यांच्यासह असंख्य तरुणांनी गुट्टे काका मित्रमंडळात जाहीर प्रवेश केला.

याप्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष गणेशराव रोकडे, मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे, रासपा जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, जि.प. सदस्य किशनराव भोसले, जिल्हा संपर्कप्रमुख संदीप माटेगावकर, पालम तालुका प्रभारी माधवराव गायकवाड, गंगाखेड तालुका परभणी हनुमंत मुंडे, पालम तालुका अध्यक्ष बालासाहेब रोकडे, ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बालाजी रुद्रवार, पूर्णा तालुका अध्यक्ष गणेशराव कदम, रासप पालम तालुका अध्यक्ष तुकाराम पाटील, चांदोमामा बोबडे, हरिभाऊ कदम, सुभाषराव देसाई, छगनराव मोरे, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवाजी पवार, भगवानराव शिरसकर, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.