गडचिरोली- विजय भाऊ वडेट्टीवार यांच्या वाढदिवसा निमित्ताने अपंगाना सायकल वाटप

35

🔹आष्टी परीसरातील अपंगांना मिळाले चार सायकल सौ रूपालीताई पंदिलवार जिल्हा परिषद सदस्य यांच्या प्रयत्नाला यश

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालूका प्रतीनिधी)मो:-9404071883

चामोर्शी(दि.13डिसेंबर):- आष्टी परिसरातील अपंगाना तीन चाकी सायकल. मिळवून देण्याकरिता जिल्हा परिषद सदस्य सौ रूपालीताई पंदीलवार व सामाजिक कार्यकर्ता संजय भाऊ पंदीलवार यांनी आष्टी परिसरातील अपंगांना सायकल तीन चाकी सायकल मिळवून देण्याकरिता प्रयत्न करून मा. विजय भाऊ वडेट्टीवार मदत व पुनर्वसन मंत्री. यांच्या वाढदिवसा निमित्ताने गडचिरोली येथे आष्टी परिसरातील अपंगांना नेऊन चार जनांना तीन चाकी सायकल मिळवून दिल्या या अपंग बांधवांना तीन चाकी सायकल मिळवून दिल्याने बाहेर फिरण्यास मदत झाले असल्याने जिल्हा परिषद सदस्य रूपाय पंदीलवार सामाजिक कार्यकर्ते संजय भाऊ पंदीलवार यांचे परिसरातील नागरिकांकडून व अपंग बांधवांकडून कौतुक केले जात आहे