सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाचे २१ व्या वर्षात पदार्पण

28

🔹मान्यवरांच्या उपस्थितीत २० वा वर्धापनदिन उत्साहात

✒️ठाणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)

 ठाणे(दि.15डिसेंबर):-सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ या पन्हाळा तालुक्यातील माळवाडी कोतोली या छोट्याशा गावात प्रा एन डी चौगुले सर यांनी दोन दशकांपूर्वी लावलेल्या इवल्याशा रोपाचे आता एन डी चौगुले ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स असे वटवृक्षात रूपांतर झाले अाहे. या संस्थेचा २० वा वर्धापनदिन सोहळा मंगळवार दि १२ डिसेंबर राेजी आसुर्ले पोर्ले येथील संस्थेच्या मुख्य शिक्षण संकुलात उत्साहात पार पडला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे कार्याध्यक्ष आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी चे कार्यकारी परिषद सदस्य प्रा एन डी चौगुले सर हे लाभले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय आसुर्ले पोर्ले चे प्रभारी प्राचार्य प्रा आर व्ही देवठाणेकर सर हे होते. संस्थेचे उपाध्यक्ष श्री भाऊसो पाटील, उपप्राचार्य प्रा व्ही. बी तळेकर सर, बनाई चौगुले कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मांजरे ता शाहूवाडी च्या प्रभारी प्राचार्या व्ही जी कुंभार मॅडम, संचालिका सौ शारदा लव्हटे मॅडम, प्रिन्स शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक व हुतात्मा नंदकुमार पाटील ज्युनिअर कॉलेजचे प्रभारी प्राचार्य प्रा एस डी कुंभार सर, एनसीसी विभागाचे प्रमुख सुभेदार मेजर आर एस पाटील सर , हवालदार एस बी जांभीलकर सर व संस्थेचे जनसंपर्क अधिकारी मुरलीधर कुलकर्णी यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी देवी सरस्वतीचे प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला . मान्यवरांच्या सत्कारानंतर सकाळ माध्यम समूहाच्या वतीने घेण्यात आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधी पदाच्या निवडणुकीत अध्यक्षस्थानी निवडून आलेल्या धनश्री चौगुले व उपाध्यक्षपदी निवडून आलेल्या पंकज करवंजे यांचाही उपाध्यक्ष भाऊसो पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर शिवाजी विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या क्रीडा स्पध्रेतील विजेत्या अक्षय मोहिते यांचा व रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांचाही सन्मान करण्यात आला. यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रिन्स शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूलचे मुख्याध्यापक व हुतात्मा नंदकुमार पाटील ज्यु. कॉलेजचे प्रभारी प्राचार्य प्रा एस डी कुंभार सर यांनी इंग्रजीतून केले. त्यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या वीस वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला.
यानंतर संस्थेच्या संचालिका सौ शारदा लव्हटे मॅडम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या स्थापनेच्या काळातील काही आठवणी जागवल्या.यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि संस्थेचे सर्वेसर्वा व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी चे कार्यकारी परिषद सदस्य प्रा एन डी चौगुले सर यांचे भाषण झाले. त्यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या दोन दशकांच्या प्रगतीचा आढावा घेतला.

तसेच संस्थेचा २१ वर्धापन दिन सोहळा केंद्रीय मंत्री तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदी मान्यवरांच्या उपस्थितीत भव्यदिव्य प्रमाणात पुढच्या वर्षी साजरा केला जाईल असे घोषित केले व या कार्यक्रमाच्या तयारीला आतापासूनच लागा असे आपल्या सर्व सहकार्यांना आवाहन केले.प्रमुख पाहुण्यांच्या भाषणानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा आर व्ही देवठाणेकर सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या भाषणात चौगुले सरांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुढील वर्षीचा वर्धापन दिनासाठी जे जे करावे लागेल तेथे सर्व करू असे आश्वासन दिले.कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक आणि महाविद्यालयाच्या नॅक को ऑर्डिनेटर सहा प्रा आर एस पाटील मॅडम यानी सूत्रसंचालन करता करताच संस्थेविषयी च्या काही आठवणी सांगितल्या. या आठवणी सांगताना त्या काही काळ भावूकही झाल्या. आभार प्रदर्शन सहा प्रा एन ए इंगवले मॅडम यांनी केले. त्यांनीही आभार प्रदर्शनाआधी संस्थेविषयी च्या आपल्या काही आठवणी जागवल्या. कार्यक्रमाचे छायाचित्रण सहा प्रा पी व्ही झोरे सर, सहा प्रा पी आर काळे सर, श्री संदीप चौगुले सर व श्री सरदार मोरे यांनी केले.