पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या नितीन मोरे वर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत कडक कारवाई करा जिल्हा पोलीस अधिक्षकांना व्हाईस ऑफ मिडीयाचे निवेदन

159

 

अकोला : लोकसभेची आचार संहिता सुरु असतांना व्हाईस ऑफ मिडीया (सा.विं.)चे जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर यांच्यावर हल्ला करणाऱ्या भाजपा कार्यकत्यावर ‘पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत कडक कारवाई करा’ या बाबतचे निवेदन विभागीय अध्यक्ष संतोष धरमकर व विदर्भ अध्यक्ष शंकर जोगी यांच्या नेतृत्वात समस्त पदाधिकाऱ्यांचे उपस्थितीत होम डिवायएसपी विजय नाफडे यांना ३० एप्रिल रोजी दिले. त्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चनसिंह साहेबांची भेट घेतली असता गुन्हेगारावर कारवाई केल्या जाईल असे आश्वासन पत्रकार संघाला दिले.
देशामध्ये ३५ हजाराच्यावर सदस्य संख्या असलेली, पत्रकारांसाठी व त्यांच्या मुलभूत हक्कासाठी लढणारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या आदेशावरून निवेदन देण्यात आले. न्यु महसुल कॉलनीतील प्रतिष्ठीत नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, व्हाईस ऑफ मिडीया साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष तथा साप्ता. नारी ललकारचे संपादक अधिस्वीकृतीधारक ज्येष्ठ पत्रकार पंजाबराव वर यांच्यावर गुंड प्रवृत्तीच्या व भाजपचा कार्यकर्ता नितीन किसन मोरे यांनी लोकसभेची आचारसंहिता सुरु असतांना, सार्वजनिक ठि़काणी प्रा.अंजलीताई आंबेडकर व कोण्याही काँग्रेसची सभा होऊ देणार नाही, अन्यथा वाईट परिणाम होतील अशी उर्मटपणे धमकी नितीन मोरे यांनी दिली. पत्रकार पंजाबराव वर यांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर मोरे यांनी भ्याड हल्ला केला म्हणून सर्व स्तरांतून जाहिर निषेध होत आहे. पत्रकारावरील हल्ला हा लोकशाहीच्या चौथ्या स्थंभावरील हल्ला होय. आंचारसंहिता सुरु असतांना पत्रकारावर हल्ला करणाऱ्या नितीन मोरे यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करा, पत्रकारांवर हल्ला करणााऱ्या नितिन मोरेला कठोर शासन करावे, जेणे करून असे कायदा हातात घेणारे कृत्ये करण्यांस कोणीही धजावणार नाही असेही पत्रकात म्हटले आहे. यावेळी निवेदन देतांना संतोष धरमकर (विभागीय अध्यक्ष), शंकर जोगी (विदर्भ अध्यक्ष सा.विंग), जिल्हाध्यक्ष (सा.विं.) पंजाबराव वर, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ.संजय भ. निकस , जिल्हा उपाध्यक्ष बुडन गाडेकर, डी. जे. वानखडे, अनिल मावळे, पुलचंद सहदेव मौर्य मा.एजाज भाई, संतोष मोरे, रमेश समुद्रे, सैय्यद जमीर (जेके), अ‍ॅड.प्रजानंद गंगाराम उपर्वट, समीर खान, अजय विजय वानखडे, इमरान खान पठाण विधी सल्लागार अ‍ॅड. एम. एस. इंगळे, आशिष पवार आदीं संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.