कुस्ती स्पर्धेत चौसाळा महाविद्यालयाचा विद्यार्थी शुभम थोरात सर्वप्रथम…..

29

✒️नवनाथ आडे(विशेष प्रतिनिधी)

बीड प्रतिनिधी(दि.15डिसेंबर):-चौसाळा येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालया मध्ये शिकत असणारा विद्यार्थी शुभम थोरात हा 70 किलो वजनी गटांमध्ये नुकत्याच जालना येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन निवड चाचणी स्पर्धेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून सर्वप्रथम आला असून. शुभम थोरात याने चपळ खेळाच प्रदर्शन करून उपस्थितांची मने जिंकली होती या यशामुळे चौसाळा महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर पडली असून विद्यापीठाच्या संघात सुद्धा त्याची निवड झाली आहे त्यामुळे त्याचे महाविद्यालय आणि परिसरात सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

या त्याच्या यशामुळे नवगण शिक्षण संस्थेचे आधारस्तंभ जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माननीय नामदार माजी मंत्री जयदत्त (आण्णा) क्षीरसागर,सचिव डॉ. भारतभूषण क्षीरसागर,
सौ के ,एस ,के ,महाविद्यालय बीड येथील प्राचार्य डॉ. दीपाताई क्षीरसागर, युवा नेते योगेश भैय्या क्षीरसागर, संस्थेचे प्रशासक राजीव मचाले ,देशमाने सर, चौसाळा महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन मधुकर राजपंखे, महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर संजय कदम, उपप्राचार्य पंडित गुंजाळ इत्यादी मान्यवरांनी शुभम चे अभिनंदन केले असून. मंगळवारी दुपारी अकरा वाजता महाविद्यालयामध्ये शुभम चा भव्य सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शुभम चे कुस्तीतील गुरु व वाशी तालुका शिवसेना उपप्रमुख तात्यासाहेब बहिर, महाडिक साहेब, प्राचार्य राजपंखे सर ,डॉ .आवारी, डॉ. पोकळे, हिरवे, प्राध्यापक नामदेव कळस्कर, इत्यादी सह विद्यार्थी आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आशिष तोडकर राहणार आष्टी हा विद्यार्थी सुद्धा उपस्थित होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सुधीर माने यांनी केली प्रास्ताविक डॉक्टर संजय कदम यांनी केली असून आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉ. विलास भिल्लारे यांनी मानले.