दरमजल लघुपटाच्या प्रदर्शनाचा व आगामी मराठी चित्रपटासाठीच्या ऑडिशनचा कलावंतांनी लाभ घ्यावा. – डॉ. चंद्रशेखर कणसे

27

✒️सिरसाळा(पुरोगामी न्युज नेटवर्क)

सिरसाळा(दि.15डिसेंबर):-सिरसाळा ता. परळी येथील श्री पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालय सिरसाळाच्या वतीने कशिदा क्रिएशन प्रस्तुत ‘दरमजल’ या लघुपटाचे स्क्रिनिंग ( प्रदर्शन ) आणि आगामी मराठी चित्रपटासाठी 20-60 वय असलेल्या स्त्री व पुरूष कलावंतांसाठी ऑडिशनचे आयोजन 17-12-2021 शुक्रवार रोजी श्री पंडितगुरू पार्डिकर महाविद्यालयातील नाट्यशास्त्र विभागामध्ये करण्यात आले आहे.

या संधीचा लाभ परिसरातील सर्वांनी घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. पी. कदम आणि नाट्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. चंद्रशेखर कणसे यांनी केले आहे. याप्रसंगी
‘दरमजल’ या लघुपटाचे लेखन व दिग्दर्शन करणारे विजय जावळे व सहदिग्दर्शन सुरेश सुंबरे व कार्यकारी निर्माता असणारे जितेंद्र सिरसाट हे उपस्थित राहणार आहेत. प्रस्तुत लघुपटास प्रतिष्ठित अशा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विविध पुरस्काराने गौरविण्यात आले.