आष्टी शहराच्या कायापालट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय….राहिलेल्या कामासाठी,एकविचारी नगरसेवकांना निवडून द्या – आ.सुरेश धस

64

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि 16डिसेंबर):-लोकप्रतिनिधी हा गोरगरीब जनतेचा आधार असला पाहिजे.अहोरात्र जनतेच्या सेवेत असला पाहिजे,शहरात पिण्याचे पाणी,स्वच्छता आणि दर्जेदार सिमेंट रस्ते,पेव्हींग ब्लॉकचे रस्ते,शहराला हरित आणि सुंदर बनवण्याचा प्रयत्न केला.शहराचा कायापालट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.जी कामे शिल्लक आहेत ती कामे करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सर्व एकविचारी उमेदवारांना विजयी करून बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन बीड,उस्मानाबाद,लातूर मतदारसंघाचे विधान परिषद सदस्य आ.सुरेश धस यांनी यावेळी बोलताना केले.आष्टी नगरपंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचे प्रचाराच्या समारंभप्रसंगी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हा सरचिटणीस ॲड.सर्जेराव तांदळे,जिल्हा उपाध्यक्ष संजय आजबे,सय्यद तय्यब,रिपाईचे अरुण निकाळजे,यशवंत खंडागळे,सरपंच अनिल ढोबळे हे होते.तर सर्व प्रभागाचे उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते.

आष्टी नगर पंचायत निवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळीस सुरूवात झाली असून,आष्टी शहरातील शनिचौक येथे भाजपाच्या उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ दि.१५ रोजी सांयकाळी साडेसात वाजता आ.सुरेश धस यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला.
यावेळी पुढे बोलताना आ.धस म्हणाले की,शहरातील विकास कामे करतांना व्यापारपेठेतील काही अतिक्रमणे काढण्याची वेळ आली.त्यामुळे जे काही व्यावसायीक नाराज झाले त्यांचे मागे पुढेही आम्हीच बघतोत,परंतु या विकास कामे करण्यापेक्षा विरोधकांनी या विकासकामात खोडा घालण्याचे काम केले.आम्ही विरोधकांना काहीही बोलणार नाही आणि त्यांच्यावर टिका देखील करणार नाहीत.कारण आम्ही शहरात काय केले आहे हे सांगायची गरज नाही.आमचे काम शहराला दिसत आहे.सर्व उमेदवारांनी आपण पाच वर्षात केलेल्या कामांची माहिती द्यायची आहे.सन २०१५ ची नगर पंचायत आपण तुमच्या बळावर सत्ता मिळवली आहे.यावर्षीची निवडणूक पाच वर्षाने नाहीतर सहा वर्षांनी लागली आहे.ही निवडणूक कोरोनामुळे एक वर्ष पुढे ढकलली आहे.

शहरातील काम करतांना आमच्याकडून काही चुका झाल्या असतील,कामांना दिरंगाई झाली असेल.पण आम्ही गेल्या पाच वर्षात शहरासाठी भरपूर प्रमाणात सोयी – सवलाती देण्यात यश आले आहे.शहरातील प्रमुख रस्त्यांनसह गल्ली बोळात रस्ते केले आहेत.शहरात गर्दी होऊ नये म्हणून बायपासही केला आहे.परंतु हे सर्व करतांना लोकांचे व्यापा-यांचे दुकाने काढण्याची वेळ आली,त्यांच्यावर अन्याय होवु देणार नाहीत तर भविष्यात त्यांचाही प्रश्न आम्हीच सोडवणार आहोत.असे प्रतिपादन आ.सुरेश धस यांनी केला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्जेराव तांदळे म्हणाले,आजची सभा ही प्रचाराची नारळ फोडण्याची नसून,विजयी सभा असल्याचे जाहिर केले.तसेच या निवडणूकीत विरोधकांचे डिपाॅजिट जप्त करायचे असल्याचेही त्यांनी सांगीतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे यांनी केले.तर सुत्रसंचलन दिपक उंबरकर यांनी केले तर आभार डॉ.दिपक भवर यांनी मानले.
———————————————-
भोंगा लाऊन घरकुल वाटप केले – पंतप्रधान आवास योजनेतून आम्ही शहरात भोंगा लाऊन वाटप केले आहे.या घरकुल वाटपात आम्ही आपला तुपला न बघता सरसकट घरकुल वाटप केले आहे.एवढेच नाही तर कागदपत्रांना सुध्दा आम्ही रूपाया घेतला नसल्याचेही आमदार धसांनी सांगीतले.
———————————————-
आझान सुरू होताच आ.धसांनी भाषण थांबविले – शहरात निवडणूक प्रचाराची नारळ फोडून आमदार धस यांचे भाषण सुरू असतांना मुस्लीम धर्माची अझान सुरू होताच आमदार सुरेश धसांनी आपले भाषण थांबविले