मोबाईलचा अनावश्यक वापर टाळा :- प्रा .लक्षण मेश्राम

27

🔹महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय देसाईगंज वडसा येथे व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.19डिसेंबर):-मोबाईल ही अत्यावश्यक गरज झाली असली तरी नेहमी मोबाईल मध्ये लक्ष खिळवून ठेवणे योग्य नाही विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने मोबाईलचा अतिरेक वापर घातक आहे नियमित अभ्यास करण्यासाठी मोबाईलचा अनावश्यक वापर टाळून वेळेचे व अभ्यासाचे नियोजन करावे असे मार्गदर्शन ब्रह्मपुरी येथील इन्स्पायर करिअर अकॅडमीचे संचालक प्रा. लक्ष्मण मेश्राम यांनी केले.देसाईगंज वडसा येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय मध्ये शैक्षणिक वर्ष 2021- 22 मध्ये माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी ते बोलत होते सोबतच दहावी व बारावीच्या परीक्षांच्या अभ्यासाचे नियोजन कसे करावे त्याबद्दल सुद्धा त्यांनी सखोल मार्गदर्शन केलं यावेळी संस्थेचे अध्यक्ष जयंत हटवार यांनी दहावी बारावी नंतर पुढे काय ? अभ्यासाचा ताण तणाव, आधुनिक तांत्रिक युगातील आव्हाने पेलण्यासाठी मानसिक सक्षमीकरण स्पर्धा परीक्षांचे महत्त्व आदी विषयांवर मार्गदर्शन केले यावेळी संस्थेच्या सहसचिव अंजली हटवार यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. कार्यक्रमास मुख्याध्यापक जे एन बुद्धे उपमुख्याध्यापक डी .जे .भुपाल, पर्यवेक्षक पि के बारसागडे कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन तथा आभार प्रदर्शन प्राध्यापक अक्षय देशमुख यांनी केले.