टायर फुटल्याने शिक्षकाच्या गाडीचा भीषण अपघात, जिज्ञासा अकॅडमीचे संचालक ठार; चार विद्यार्थी जखमी

30

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.19डिसेंबर):-मुलांना सोडण्यासाठी काळेगावला निघालेल्या गाडीचे टायर फुटल्याने गाडी पलटी झाली. या अपघातात जिज्ञासा अकॅडमीचे संचालक गंभीररित्या जखमी होऊन ठार झाले तर चार मुलं जखमी झाले.ही घटना मध्यरात्रीच्या दरम्यान बाभळखुंट्याजवळ घडली. जखमी विद्यार्थ्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविंद्र शेळके हे रात्री पुण्यावरून बीडला आले होते. बीडहून ते काळेगावकडे मुलांना सोडण्यासाठी निघाले होते.बाभळखुंट्याजवळ त्यांच्या गाडीचे टायर फुटल्याने गाडी पलटी झाली.

यात रविंद्र शेळके गंभीररित्या जखमी होऊन ठार झाले तर आतील चार विद्यार्थी जखमी झाले. हे विद्यार्थ्यांनी कसेबसे बाहेर निघले. त्यांनी शिक्षक शेळके यांना बाहेर काढले मात्र ते मृत झाले होते.जखमी विद्यार्थ्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिक्षक शेळके हे विद्यार्थ्यांना पुणे येथे एका कार्यक्रमानिमित्त घेऊन गेले होते. त्यांना परत गावाकडे घेऊन जात असताना ही दुर्दैवी घटना घडली.शेळके हे मुळचे वांगी येथील असून त्यांचे बीड शहरातील नाट्यगृहाजवळ जिज्ञासा अकॅडमी नावाचे कोचिंग क्लासेस आहे. त्यांच्या या अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.