लोक विद्यालय गांगलवाडी येथे सिकलसेल समुपदेशन शिबिर…

30

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.19डिसेंबर) :-सर्वोदय युवा विकास संस्थेचा उपक्रम. सर्वोदय युवा विकास संस्थे तर्फे लोक विद्यालय गांगलवाडी येथे सिकलसेल समुपदेशन शिबिर घेण्यात आले शिबिरादरम्यान सिकलसेल आजार आनुवंशिक असून या आजाराची तपासणी होणे आवश्यक आहे. भावी जोडीदार निरोगी असेल तर पुढील पिढी ही निरोगी होईल. व सिकल सेल आजारांमध्ये हात ,पाय, सांधेदुखी,जास्त प्रमाणात असते.तसेच रक्ताचे प्रमाण फार कमी असते.

या आजाराची मुख्यता दोन प्रकार असतात,( १) म्हणजे सिकलसेल वाहक, (As)तर दुसरा सिकलसेल पीडित SS .. दोन वाहक व्यक्तीचे लग्न झाल्याने हा आजार जास्त फोफावत आहे,जर अश्या दोन वाहक व्यक्तीने लग्न केल्यास त्यांनी गर्भजल चाचणी करून निरोगी बाळाला जन्मास घालू शकते तसेच सिकलसेल पीडित रुग्णाने नेहमी वैद्यकीय अधिकारी यांचे सल्ला ,संतुलित आहार ,औषधोपचार नियमित लसीकरण घेतल्याने सुद्धा सर्वसामान्य माणसाप्रमाणे जीवन जगू शकतो . शासनाकडून सिकलसेल पीडित व्यक्तींना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेता येतो. इत्यादी माहिती सर्वोदय युवा विकास संस्थेचे कार्यकर्ते यांचे मार्फत देण्यात आली.