तिसऱ्या दिवशीही गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संपावर.. ??

31

🔹विद्यार्थी आणि मॉडरेशनसाठी आलेल्या प्राध्यापकांना आल्या पावली परतावे लागले..

🔸आंदोलनाची दखल न घेतल्यास तिव्र आंदोलनाचा ईशारा- संघटनेची माहिती.

✒️गडचिरोली प्रतिनिधी(चक्रधर मेश्राम)

गडचिरोली(दि.21.डिसेंबर):-आश्वासीत प्रगती योजनेसह रद्द केलेले शासन निर्णय शासनाने तातडीने पुनर्जीवीत करावे. सातव्या वेतन आयोगाच्या ५८ महिण्याच्या फरकाची रक्कम देय करावी, आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे आर्थिक मुलभूत हक्क द्यावे, १०-२०-३० लाभांची आश्वासीत प्रगती योजना शासनाने लागू करावी, शासनाच्या नियमानुसार आणि इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांनुसार पाच दिवसाचा आठवडा लागू करावा, गोंडवाना विद्यापीठातील कर्मचारी यांना एकस्तर पत्रोन्नतीचा, आणि वेतनश्रेणीचा लाभ शासनाने लागु करावा यासह अन्य प्रलंबित मागण्यांकरीता महाराष्ट्र राज्यातील महाविद्यालयीन व विद्यापीठीय कर्मचाऱ्यांनी दि. 16 नोव्हेंबर 2021 पासून राज्यव्यापी आंदोलन पुकारले असून दि. १८ डिसेंबर 2021 पासून कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलनास सुरुवात केलेली आहे. दि. 18 डिसेंबर 2021 पासून सुरू झालेले कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन हे तिसऱ्या दिवशीही सुरूच असल्यामुळे कामकाजानिमीत्य विद्यापीठात आलेले विद्यार्थी तसेच मॉडरेशन करीता आलेले संलग्नीत महाविद्यालयांचे प्राध्यापक यांची कोणतीही कामे होवू शकली नाहीत त्यामुळे त्यांना आल्या पावलीच परतावे लागले.

विद्यापीठाचे सर्व अधिकारी व कर्मचारी संपात सहभागी असल्यामुळे सर्वच कार्यालयांमध्ये भयान शांतता व शुकशुकाट पसरलेला होता. कर्मचा-यांच्या संपामुळे संविधानिक अधिकारी यांच्या व्यवस्थेकरीता रोजंदारीवरील मजुरांना तात्पुरत्या स्वरूपात कामावर लावण्यात आले. तथापी अनुभवी कर्मचारी वर्ग संपात असल्यामुळे कोणतेही कामकाज पुढे सरकले नाही.बेमुदत काम बंद आंदोलनाचा तिसरा दिवस असुनही अद्याप संबंधीत खात्याच्या मंत्र्यांनी कृती समितीच्या पदाधिकारी यांना चर्चेकरीता बोलाविले नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पुन्हा किती दिवस संप सुरू राहील. असा प्रश्नचिन्ह सर्वांपुढे उपस्थित झालेला आहे. दहा दिवसापुर्वीच विद्यापीठास नवनियुक्त कुलगुरू म्हणून डॉ. बोकारे रुजू झाले असून विद्यापीठाच्या विकासात्मक बाबीच्या अनुषंगाने त्यांची कार्ये सुरू आहेत परंतु अशातच कर्मचाऱ्यांचा संप सुरु झाला असल्यामुळे सर्व कामकाज जागच्या जागी जागी थांबलेला आहे.

सन २००२ च्या शासन निर्णयानुसार गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असलेल्या इतर शासकीय विभागातील कर्मचारी यांना एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ लागू आहे. तथापी विद्यापीठीय कर्मचारी यांनी वारंवार मागणी करूनही साफ फेटाळण्यात येते. यांचेसह पाच दिवसांचा आठवडा, सातव्या वेतन आयोगाची थकबाकी, अशा सर्वमान्य असलेल्या महत्त्वाच्या बाबी केवळ विद्यापीठीय कर्मचारी यांनाच लागू होत नाही त्यामुळे विद्यापीठीय कर्मचारी नाहीत ❓ असा सवालही कर्मचाऱ्यांनी शासनास विचारलेला आहे.इतर विभागांच्या कर्मचारी यांना आपसूक लागू होणाऱ्या बाबी केवळ विद्यापीठीय कर्मचारी यांनाच नाकारल्या जाते अशी भुमीका एक ना अनेक बाबतीत शासन घेत आहे. त्यामुळे जोपर्यंत न्याय मिळत नाही. तोपर्यंत बेमुदत काम बंद आंदोलन अविरतपणे सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे सचिव सतिश पडोळे यांनी दिली.

कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला गोंडवाना विद्यापीठ शिक्षण मंचाने सक्रिय पाठींबा दिला आहे . तसेच जुनी पेंशन हक्क संघटना जिल्हा गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष श्री. नवघडे पदाधिकारी श्री. बापू मुनघाटे यांचेसह अन्य पदाधिकारी यांनी प्रत्यक्षात आंदोलन स्थळी भेट देवून कर्मचाऱ्यांचा प्रोत्साहन वाढविला.येत्या अधिवेशनात सदर मागण्यांच्या सोडविण्यासंदर्भात शासनाने सकारात्मक भुमीका न घेतल्यास आंदोलन अधिक तिव्र करण्यात येणार असल्याचा इशारा गोंडवाना विद्यापीठ अधिकारी संघटनेचे सचिव डॉ. हेमंत बारसागडे यांनी दिलेला आहे.

याबाबत विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता भविष्यात विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. नाॅन टीचिंग कर्मचारी संपावर आहेत. अत्यंत महत्त्वाचे काम वरिष्ठ अधिकारी अधिकाऱ्यांच्या हाताने केले जात आहे. विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू यांचेशी भ्रमणध्वनी वरून संपर्क केले असता MSW विद्यार्थ्यांना नियमानुसार प्रवेश देण्यात येईल. या बाबत कावळे यांचेशी संपर्क साधावा असे म्हटले आहे.