महापुरुषांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही;परळीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून कर्नाटकातील घटनेचा निषेध !

29

🔹छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास केला दुग्धाभिषेक

✒️अतुल बडे(परळी वैजनाथ,प्रतिनिधी)

परळी(दि.21डिसेंबर):-विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची कर्नाटकात समाजकंटकाकडून विटंबना करण्यात आली होती. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून राज्यभरामध्ये ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात येत आहे.परळीतही आज सोमवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या आदेशावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी परळीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिषेक केला सकाळच्या सुमारास परळी नगर परिषदेच्या अग्निशमन वाहनांनी पाणी मारून पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली संपूर्ण पुतळ्या भोवती भगव्या ध्वजांची उभारणी करण्यात आली होती. अभिषेकाच्या सुरुवातीस पुतळ्याच्या समोरील भगवी पताका फडकवण्यात आली. छत्रपती शिवराय आमचा स्वाभिमान आणि अभिमान आहेत. कर्नाटकात पुतळ्याची विटंबना करण्यात आली ही निषेधाची गोष्ट आहे.

आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे संयमी कार्यकर्ते आहोत म्हणून दुग्धाभिषेक करत आहोत, परंतु अशा घटना भविष्यात घडल्या तर त्या आम्ही खपवून घेणार नाहीत. मतांचा जोगवा मागणाऱ्या भाजपचे लोक फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा फक्त वापर करतात. एवढेच महाराजांबद्दल प्रेम असेल तर पंतप्रधानांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा असे प्रतिपादन यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले.तर छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त आपलेच नव्हे तर अवघ्या जगाचे दैवत आहेत. कर्नाटकात झालेली पुतळ्याची विटंबना ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. याबाबत भाजपचे सरकार गंभीर नाही याचा अर्थ महाराजांवरील त्यांचे प्रेम बेगडी आहे. बहिरे आणि मुके असलेल्या केंद्र सरकारला जागे करण्यासाठी आज आम्ही पक्षाच्या आदेशाप्रमाणे शांततेत निषेध करत आहोत. भविष्यात अशी घटना घडली तर आम्ही शांत बसणार नाही.असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ यांनी दिला.

यावेळी तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ,शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संगीताताई तुपसागर, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश टाक,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य वैजनाथ सोळंके,अय्युबभाई पठाण,संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष राजाभाऊ पोळ,युवक तालुकाध्यक्ष गोविंद कराड,जिल्हा सरचिटणीस माधव मुंडे,जिल्हा उपाध्यक्ष दिनेश गजमल,नगरसेवक विजय भोयटे,शंकर आडेपावर,अनिल आष्टेकर,किशोर पारधे,रविंद्र परदेशी,महादेव रोडे,वैजनाथ बागवाले,रमेश भोयटे,राजेंद्र सोनी,जयराज देशमुख,नितीन रोडे,शेख शम्मो,गोविंद कुकर,केशव गायकवाड,जयप्रकाश लड्डा,चित्राताई देशपांडे, उमाताई धुमाळ,अमोल कानडे,रवी मुळे,शंकर कापसे,पप्पु काळे, राधाकृष्ण साबळे,बळीराम नागरगोजे,गिरीष भोसले के.डी.उपाडे,दत्ताभाऊ सावंत,सुभाष वाघमारे,शुभम देशमुख,अनंत ढोपरे,अमर रोडे,धम्मा अवचारे, पवन फुटके, अमित केंद्रे,राहुल जगतकर,प्रताप समदंरसावळे,सचिन अरसुळे,शशिकांत बिराजदार,प्रा.शामासुंदर दासूद,सय्यद अल्लाउद्दीन,शरद कावरे,राम ढेंगळे,जितेंद्र नव्हाडे,श्रीकांत माने,प्रदीप जाधवर,बालाजी वाघ,राजू शेख,संदीप दिवटे पाटील,अभि गित्ते , दीपक मुरकुटे,संदीप शिंदे,विकी देशमुख,अनिलराजे कदम,सचिन बनसोडे,नारायण दिवटे,सचिन कराड,विशाल गायके, भगवान सातभाई, सिद्धेश्वर मुंडे,गणेश सुरवसे,शेख बिलालआदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.