चामोर्शी : एसटी बंदचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना

47

🔹पाच सहा किलोमीटर पायदळ प्रवास वन्यप्राण्यांपासून धाेका

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालूका प्रतीनिधी)मो:-9404071883

चामोर्शी(दि.22डिसेंबर):-एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी राज्यभर बेमुदत संप सुरू आहे. शासनाने काही मागण्या मान्य केल्या असल्या तरी .कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे.मारकंडा कंनसोबा . ठाकरी .कूनघाडा .सह आष्टी परिसरातील अनेक गावचे विद्यार्थी पायदळ सहा सात किमी आष्टी येथे ये-जा करीत आहेत. यात त्यांना एका दिवशी सहा सात किमीची पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे लवकर बसफेऱ्या पूर्ववत सुरू कराव्या, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांनी केली आहे.

दिवाळीपासून अनेक शाळा आणि महाविद्यालये पूर्ववत सुरू झाली; परंतु बसफेऱ्या बंद असल्याने अनेक विद्यार्थी शाळा व महाविद्यालयांत अद्यापही गेले नाहीत. दूरवर शाळा व महाविद्यालये असल्याने विद्यार्थ्यांची अडचण हाेत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

आष्टीवरून सहा सात किमी अंतरावर असलेल्या आष्टी शहरात अनेक विद्यार्थी पायदळ ये-जा करतात. अनेक जण खासगी वाहनाने प्रवास करतात. यासाठी त्यांना पैसे माेजावे लागतात; परंतु ज्यांची आर्थिक स्थिती कमकुवत आहे, असे विद्यार्थी पायदळ जातात. आष्टी शहरापासून ८ ते १० किमी अंतरावर असलेल्या गावातून अनेक विद्यार्थी पायदळ आष्टी येथे शिक्षणासाठी येत आहेत. विद्यार्थ्यांची गैरसाेय थांबविण्यासाठी लवकर बसफेऱ्या सुरू कराव्या, अशी मागणी विद्यार्थी व पालकांनी केली आहे.विशेष म्हणजे, आष्टी परीसरात वन्यप्राण्यांपासून धाेका आहे. अशास्थितीत पायदळ चालणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्ला हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. .