शोभाताई बारसिंगे यांचे दिघऀ आजाराने दु: खद निधन

31

✒️गडचिरोली प्रतिनिधी(चक्रधर मेश्राम)

गडचिरोली(दि.23डिसेंबर):- गडचिरोली येथील रामनगर स्थित जिल्हा परिषद शिक्षिका सौ. शोभा ( प्रतिभा) प्रभाकर बारसिंगे यांचे दिघऀ आजाराने उपचारा दरम्यान नागपूर येथे आज सकाळी 6 वाजता दु खद निधन झाले. मृत्यू समयी त्या 50 वर्षाच्या होत्या. त्यांनी जिल्हा परिषद अंतर्गत अनेक ठिकाणी प्रामाणिकपणे नोकरी केली.

त्या स्वभावाने शांत आणि संयमी , सुस्वभावी होत्या. त्यांच्या दु:खद निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. आज दि. 23/12/2021 रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास कहाणी नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.