रुग्ण हक्क परिषदेच्या अवाहनाला प्रतिसाद देत अझहरभाई अन्सारी यांनी तब्बल साडेसहा लाख रुपयांचा जनरेटर आरएचपी हॉस्पिटलला केला दान!

31

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

पुणे(दि.25डिसेंबर):-रुग्णांचे हक्क – अधिकारासाठी लढणारी आयएसओ मानांकित भारतातील पहिली संघटना म्हणजेच रुग्ण हक्क परिषद होय. रुग्णहक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रुग्णसेवेचे राष्ट्रीय प्रतीक म्हणून उभारलेल्या पुण्यातील कोंढवा येथील आरएचपी हॉस्पिटल मध्ये सुसज्ज अतिदक्षता विभाग, अद्ययावत शस्त्रक्रिया विभाग, स्वतंत्र स्त्री-पुरुष कक्ष आणि सर्वच प्रकारच्या उपचारांसाठी परिषदेने स्वतः जवळील करोडो रुपये खर्चून रुग्णसेवेचे आदर्श असे हॉस्पिटल उभे केले आहे.

अत्यंत सुंदर आणि देखण्या अद्ययावत आरएचपी हॉस्पिटलमध्ये सद्य परिस्थितीमध्ये दोन व्हेंटिलेटर, विद्युत पुरवठा करिता जनरेटर आणि काही लाख रुपयांची वैद्यकीय यंत्रसामग्रीची गरज असून इच्छुक दानशूरांनी व्हेंटिलेटर – जनरेटर्स इत्यादी वस्तू दान कराव्यात, असे आवाहन आरएचपी हॉस्पिटलचे प्रवर्तक रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी स्वतः केले होते. रुग्ण हक्क परिषदेच्या अवाहनाला प्रतिसाद देत पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती अझहरभाई अन्सारी यांनी तब्बल साडेसहा लाख रुपयांचा जनरेटर आरएचपी हॉस्पिटलला दान केला आहे.

यावेळी प्रसिद्ध उद्योजक अजहरभाई अन्सारी यांचा सत्कार संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते आरएचपी हॉस्पिटल आणि रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक मोहसिन खान, परिषदेच्या जनरल सेक्रेटरी अपर्णा साठे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सलीम आळतेकर, मुख्य व्यवस्थापक संजय जोशी, रुग्ण हक्क परिषदेचे चंद्रकांत सरवदे, फारुख सय्यद, गिरीश घाग, सलीम कुरेशी यांच्यासह आरएचपी हॉस्पिटल मधील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.तब्बल साडेसहा लाख रुपयांचे विद्युत उपकरण (जनरेटर) अजहरभाई अन्सारी यांनी आरएचपी हॉस्पिटलमध्ये दान दिल्याबद्दल त्यांचे राज्यात सर्वत्र कौतुक होत आहे.