………सहजीवनाचा अर्थ काय?

31

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो केंद्र सरकारने घेतलेल्या मुलीचे लग्नाचे वय 18 वरून 21 वर्षे करण्याच्या निर्णयावर माझे पूर्णतः सहमत आहे.
केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे मुलीला स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळाली मला या निर्णयावरून मुलगा आणि मुलगी समान असतात असे स्पष्टरित्या दिसून येते. या निर्णयामुळे आम्हा मुलींना एक वेगळीच दिशा मिळाली. व तसेच आम्हा मुलीला एक प्रकारचा आधार मिळाला ज्या मुलीच्या अंगावर वयाच्या आधीच जो भार पाडला जातो त्याआधीच सहजीवन म्हणजे काय? हे समजण्याच्या आगोदर लग्नाची माळ तिच्या गळ्यात टाकली जाते. सहजीवनाचा अर्थ काय? लग्नाचा अर्थ काय? फक्त एक सायंटिफिक दृष्ट्या तिची शारीरिक वाढ पूर्ण झाली 18 वर्षापर्यंत म्हणून तीच लग्न करून देण्याचा निर्णय जो आम्ही घेतलेला होता तो कदाचित ती तेव्हाची गरज होती. आणि आताची गरज ही आहे कारण आपल्याला समाजात स्त्री चित्र घडून येत आहेत. सामाजिकदृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या, 21 वर्षापर्यंत तीची किमान पदवी पर्यंत तर तिचे शिक्षण पूर्ण होऊ शकते. जेणेकरून त्या पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्यापर्यंत तिचे जे अडथळे येतात त्या अडथळ्यांना कुठेतरी लगाम लागेल या निर्णयाने मला वाटतं मोठा फायदा होऊ शकतो.

जेणेकरून 21 वर्षापर्यंत तिची पदवी पूर्ण होईल आणि त्या मुलीचा सर्वांगीण विकासासाठी ती गोष्ट लागू पडणार आहे. केवळ लग्न केल्याने येणाऱ्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या समजून घेण्यासाठी एका पदवीपर्यंत जर उच्चशिक्षण घेण्यापर्यंत तिची जी अवस्था आहे. की ती ज्या वेगवेगळ्या लोकांना भेटणार आहे. वेगवेगळ्या वर्तुळामधून ती जाणार आहे तोपर्यंत तिची एक सामाजिक समाज थोडीफार का होईना पण पक्की झालेली असते.18 वर्षाच्या मुली मध्ये एवढी पक्की नसते.

मला असं वाटते की हा जो बदल आहे. तो अगदी लगेच होणार नाही की लगेच लोक थांबतील किंवा स्वीकारतील आणि18 वर्षातून लगेचच 21 वर्षापर्यंत थांबतील मुलीचे लग्न लावून देतात की 18 वर्षे पूर्ण झालेत करणार काय 18 सामाजिक बदल आहे सामाजिक ढाचा आहे. हा सामाजिक ढाचा हलवण्यासाठी मला वाटते कायद्याची मदत होईल. कारण कायद्याचा एक धाक असतो अमल असतो या कायद्याचा धाक मला वाटते नक्की समाजावर पडेल म्हणून मला वाटते केंद्र सरकारने घेतलेल्या मुलीचे लग्नाचे वय 18 वरून 21 वर्ष करण्याचा निर्णय योग्यच आहे. असे मला तरी वाटते.

✒️कु. ऋतुजा गजानन डांगे(वर्ग 10 वा,भगवती देवी विद्यालय, देवसरी उमरखेड यवतमाळ)मो:-9158644907