शेगाव पोलीस स्टेशन यांनी राबविले अनेक गावात अंधश्रद्धा निर्मुलन चे कार्यक्रम

33

🔹ठाणेदार मेश्राम यांचे कौतुकास्पद उपक्रम- कार्यक्रमाला जनतेचा प्रचंड प्रतिसाद!

✒️वरोरा प्रतिनिधी(मनोज गाठले)मो:-97678 83091

वरोरा(दि.26डिसेंबर):- तालुक्यातील शेगाव बू पोलीस प्रशासन स्टेशनचे ठाणेदार अविनाश मेश्राम यांनी सद्या ग्रामीण भागात सुरू असलेल्या वाईट रूढी परपंपरा जादू टोना , छुमंतर , अंधश्रद्धा , बुवा बाजी , भूत प्रेत, अश्या अनेक वाईट रूढी परंपरा ने अनेक नागरिक यांची आर्थिक, मानसिक, शारीरिक, पिळवणूक होत असून यात बहुतांश नागरिक ग्रामीण भागातील बळी पडत असल्याचे दिसून येते. शिवाय यात अनेक नागरिकांना जीवसुद्धा गमवावा लागला.

तर आनेक भोंदू बाबा यांनी आपल्या तिजोऱ्या भरल्या तेव्हा अश्या या गंभीर बाबीकडे शेगाव बू येथील ठाणेदार अविनाश मेश्राम यांनी या कडे अधिक लक्ष्य केंद्रित करून गोर गरीब जनतेची दिशाभूल पिळवणूक कायमची थांबविण्यात यावी या करिता जनतेला जागृत करण्यासाठी . शेगाव बू पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या चारगाव बू , महालगाव , बेंबडा , बिजोनी, वायगाव(ख), खानगाव , अर्जुनी, कोकेवाडा तुकुम , पारोधी , या अश्या अनेक गावांमध्ये स्वखर्चातून आझादी का अमृत महोत्सव निमित्याने अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती चंद्रपूर यांच्या सहकार्यतून विविध गावात अंधश्रद्धा निर्मुलन व त्यांचे प्रतिक्षिकरण कार्यक्रम घेण्यात आले. यात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांचे कार्यकर्ते के .डी.आत्राम चिमूर , श्री सारंग भीमटे व अन्य कार्यकर्त्यांनी लोकांना जागृत करून भोंदू बाबा महाराज कश्या प्रकारे गरीब जनतेला ठगवतात यावर मार्गदर्शन करून यावर पोलीस प्रशासन कोणती कारवाई करू शकते यावर येथील पीएसआय प्रवीण जाधव यांनी जनतेला मार्गदर्शन केले . तर कोणत्याही इसम नागरिक कडे कोणत्याही प्रकारची दैव्य शक्ती नसून , कोणताही चमत्कार नाही , ही सर्व आपली भुल आहे.

त्यामुळे अश्या अंधविश्वास कुणीही विश्वास ठेऊ नये . जर अश्या प्रकारची शक्ती असती तर छुमतर व जादू टोण्याने जर कुणी मरत असेल तर भारत पाकिस्तान च्या सीमेवर असे भोंदू बाबा व मांत्रियाकांना बसवले असते यात आमचे व पोलीस लोकांचे कोणतेच काम नसते तेव्हा जनतेनी जागृत व्हा, उच्च शिक्षण घ्या, व्यसन पासून दूर राहा . वाईट रूढी परंपरा चा कायमचा नायनाट करा, माणसाला शिक्षण , वाचन , हेच आपल्याला काय चुकीचे आहे व काय योग्य आहे हे जाणवून देते तेव्हा गोर गरीब खास करून युवा पिढी यांनी जागृत होणे अधिक गरजेचे आहे . असे मोलाचे मार्गदर्शन ठाणेदार मेश्राम यांनी दिले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रत्येक गावातील जनतेनी मोलाचे सहकार्य केले.