प्रशासनाच्या कारभाराला कंटाळून महिला बचत गटाचा आमरण उपोषणाचा इशारा

26

✒️सिद्धार्थ वाठोरे(हदगाव-नांदेड,प्रतिनिधी)

नांदेड(दि.28डिसेंबर):-ग्रामीण भागातील लोकांचे कामे ग्रामपंचायत मध्ये करावे व ग्रामपंचायत मध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे व त्यांच्या उपस्थिती बघण्यासाठी थमची व्यवस्था करावी या मागणीसाठी दि.१७नोव्होंबर रोजी तहसील कार्यालय हदगाव, गटशिक्षणाधिकारी उपविभागीय अधिकारी हदगांव यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती.प्रशासनाने कुठलीच कारवाई केली नसल्यामुळे दि.२४जानेवारी पासुन महिला बचत गटांच्या वतीने आमरण उपोषणाचा इशारा दि.२७ रोजी निवेदनाद्वारे देण्यात आला.

महिला बचत गटातील महिलांना अनेक योजनाची माहिती मार्गदर्शन मिळत नाहीत व गावस्तरावर कर्मचारी वर्ग सुद्धा येत नाहीत त्यासाठी गाव पातळीवरील जनतेच्या सेवेसाठी शासन बरेच कर्मचान्यांची निवड केलेली असते काही कर्मचारी गाव पातळीवर काम करत असतात. पण त्यातील बहुतांश कर्मचारी हे तालुक्याच्या ठिकाणावरून कामे करत असतात तर काही कर्मचारी हे गावातील एखादया प्रतिष्ठीत व्यक्तीला हाताशी धरून कधीतरी गाव पातळीवर येत असतात मुळात सांगायचे म्हणजे की, गाव पातळीवर किती कर्मचारी आहेत व त्यांची कामे काय आहेत ? हेच जनतेला माहित नसते.शासनाने त्यांना गावपातळीवर जनतेला येणाऱ्या समस्याचे निवारण मदत किंवा योग्य मार्गदर्शन करण्यासाठी त्यांची नेमणूक केली जाते.

पण गावातील लोकांना आपल्या येथे शासनाने किती कर्मचारी दिलेत हेच माहिती नसल्याने बरेच कर्मचारी हे फक्त पगारी उचलने व त्या गावात फेरफटका किंवा पाहुण्याकडे आलो असे दाखवता व निघून जातात. हे सर्वत्र होत असते त्यांना ते कोण आहेत? व त्यांचे कोणते कामे आहेत? हे माहित नसल्यामुळे जनतेची तारांबळ उडत आहे त्याकरीता गटविकास अधिकारी तहसिलदार यांनी विशेष लक्ष देवून गाव पातळीवरील सर्व कर्मचारी जसे की मंडळ अधिकारी तलाठी कृषी सहाय्यक, लाईनमेन, आरोग्य सेवक, डॉक्टर, पशुवैद्यकिय अधिकारी, ग्रामसेवक, ऑपरेटर, रोजगार सेवक, पोष्टमेन, आशा वर्कर्स अशा प्रकारचे सर्व कर्मचारी आठवडयातून एक दिवस आपआपल्या ग्रामपंचायतमध्ये उपस्थित राहुन त्याच ठिकाणी गावकऱ्याची कामे सी.सी.टी.च्या नजरे समोर करण्यात यावी.

अन्यथा हदगाव तालुक्यातील हजारो महिला बचत गटाच्या माध्यमातून दिनांक २४ जानेवारी २०२२ रोजी आमरण उपोषणाला बसणार आहेत अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे या निवेदनावर आकांक्षा वायवळ मंगल वाठोरे स्मिता सूर्यवंशी स्वरूपा श्रीसागर संगीता कदम पार्वती जाधव ज्योती कदम अर्चना सूर्यवंशी आशा वंजारे यांच्या सह्या आहेत